कर्फ्युपेक्षाही मोदींनी केलेलं 'हे' आवाहन कौतुकास्पद आहे!

ब्युरो रिपोर्ट
गुरुवार, 19 मार्च 2020

देशात कोणत्याही प्रकारचा औषधांचा तुटवडा नसून लोकांनी जीवनावश्य वस्तूंचं साठा करुन ठेवण्याचीही कोणतीही गरज नसल्याचं यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

नवी दिल्ली -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं . यावेळी त्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं म्हटलं. मुख्य म्हणजे यावेळी जनता कर्फ्यू लागू करण्याचं आवाहन मोदींनी केलं. येत्या रविवारी मार्च रोजी हा कर्फ्यू लागू करावा, असं नरेंद्र मोदी म्हणाले. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत लोकांनी आपल्या घरातून बाहेर न पडता, जनात कर्फ्यूचं पालन करावं, असं मोदी म्हणालेत. दरम्यान, संध्याकाळी 5 वाजता देशाची सेवा करणा-या राष्ट्ररक्षकांना धन्यवाद देण्याचंही आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं आहे. डॉक्टर्स, नर्स, पोलिस, माध्यमं अशा सगळ्यांचं आभार मानावेत, असं त्यांना देशाला संबोधित करताना म्हटलं आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक व्हायला हवं, तरच आपण कोरोनाचा सक्षमपणे मुकाबला करु शकू असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. जगासमोर सध्या कोरोनाचं सगळ्यात मोठं आव्हान उभं ठाकलंय. दोन महिन्यांपासून जगासमोर संकटात आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकानं तयार राहायला हवं, असंही मोदींनी म्हटलंय. 

या सगळ्या व्यतिरिक्त मोदींनी घाबरुन गेलेल्या प्रत्येकाला एका कौतुकास्पद आवाहन केलं आहे. कोरोनाची धास्ती प्रत्येकानं घेतली आहे. मात्र सामान्य शंकांसाठी हॉस्पिटल किंवा दवाखाना लगेच न गाठता प्राथमिक उपचार घ्यावे, फोनवरुन डॉक्टरांशी संवाद साधावा, असंह मोदींनी यावेळी म्हटलंय. सध्या एखादी शिंक जरी आली, तरी प्रत्येकाला कोरोनाचीच लक्षणं आहेत की काय, अशी शंका येते आहे. त्यामुळे मोदींनी केलेलं हे आव्हान अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं मानलं जात आहे. 

देशात कोणत्याही प्रकारचा औषधांचा तुटवडा नसून लोकांनी जीवनावश्य वस्तूंचं साठा करुन ठेवण्याचीही कोणतीही गरज नसल्याचं यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. त्यामुळे लोकांनी घाबरुन जावू नये, सतर्क राहावं, काळजी घ्यावी आणि खबरदारी बाळगावी, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केलं आहे. 

 

देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेली महत्त्वाची विधान खालीलप्रमाणे - 

 • '22 मार्च, रविवारी जनता कर्फ्यू लागू करावा'
 • 'सकाळी 7 ते रात्री 9 जनता कर्फ्यू'
 • रविवारी सायं. 5 वाजता राष्ट्ररक्षकांना धन्यवाद देऊ
 • डॉक्टर, नर्स,पोलिस, मीडिया, चालकांना धन्यवाद देऊ
 • 'कोरोनामुळे सर्व मानवजात संकटात'
 • 'दोन महिन्यांपासून जगावर संकट'
 • 'प्रत्येक देशवासियाला सजग राहणं गरजेचं'
 • 'जगासमोर महायुद्धापेक्षा मोठं संकट'
 • 'मला तुमच्याकडून येणारा काही काळ हवाय''कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही'
 • 'मी तुमच्याकडे काही मागण्यासाठी आलोय'
 • 'मला तुमचे दोन आठवडे पाहिजेत'
 • 'संकटाचा मुकाबला करण्यासाठी संकल्प, संयम हवा'
 • 'गर्दी टाळा, घरातून बाहेर पडणं टाळा'
 • 'सोशल डिस्टन्सिंग अत्यंत गरजेचं'
 • 'नागरिकांनी सरकारच्या सूचनांचं पालन करावं'

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

 

modi address to nation on corona virus covid 19 india marathi

 


संबंधित बातम्या

Saam TV Live