'भारत अंबानींसाठी वेगळा आणि शेतकऱ्यांसाठी वेगळा'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नवी दिल्ली- नाशिकमध्ये कांद्याच्या कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याच्या बातम्यांवरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी "अनिल अंबानींचा हिंदुस्थान आणि शेतकऱ्यांचा हिंदुस्थान वेगळा आहे' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.

गेल्याच आठवड्यात दिल्लीमध्ये देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चात भाषण करताना राहुल गांधींनी कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभावाच्या मागणीला जोरदार पाठिंबा दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर नाशिकच्या बाजार समितीत शेतकऱ्याला साडेसातशे किलो कांदा विकूनही 1064 रुपयेच पदरात पडल्याच्या बातम्या झळकल्याच्या निमित्ताने राहुल गांधींनी ट्‌विट करून पंतप्रधान मोदींवर राफेल प्रकरणाचे शरसंधान केले.

"मोदी दोन हिंदुस्थान घडवत आहेत.एक अनिल अंबानींचा हिंदुस्थान आहे. येथे काहीही न करता, एक विमानही तयार न करता मोदींकडून 30 हजार कोटींचे राफेल कंत्राट मिळते. दुसरा हिंदुस्थान शेतकऱ्यांचा आहे. येथे चार महिन्यांच्या काबाडकष्टानंतर पिकवलेल्या 750 किलो कांद्याला मोदींकडून फक्त 1040 रुपये मिळतात,' असा टोला राहुल गांधींनी ट्‌विटद्वारे लगावला आहे.

Web Title: PM Modi Creating 2 Indias, One For Ambani, One For Farmers

संबंधित बातम्या

Saam TV Live