'पुलवामाच्या हल्ल्यानंतर देश दुःखात अन् मोदी शुटिंगमध्ये'

'पुलवामाच्या हल्ल्यानंतर देश दुःखात अन् मोदी शुटिंगमध्ये'

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले त्यावेळी संपूर्ण देश दुःखात बुडाला होता. पण, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तराखंडच्या जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळपर्यंत एका फिल्मसाठी व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

पुलवामा हल्ल्याच्या आठवडयाभरानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रसेचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले, 'पुलवामा येथे दुपारच्यावेळी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश दुःखात बुडाला होता. मात्र, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळपर्यंत एका फिल्मसाठी व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते. जगात तुम्ही असा पंतप्रधान कुठे पाहिला आहेत का? माझ्याकडे खरोखर बोलण्यासाठी शब्द नाहीत.'

'पंतप्रधान मोदींनी पुलवामा हल्ल्याला गांर्भीयाने घेतले नाही. या हल्ल्यावरुन भारतीय जनता पार्टी राजकारणही करत आहे. मोदींना राजधर्माचा विसर पडला असून ते सत्ता वाचवण्याच्या मागे लागले आहेत. हुतात्मा झालेल्या जवानांच्या सन्मानापेक्षा मोदींना सत्तेची लालसा जास्त आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आसामच्या सभेत पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन राजकारण केले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, कारण आता केंद्रात काँग्रेसचे नाही भाजपचे सरकार आहे असे सांगून त्यांनी या मुद्दावरुन राजकारणाचा प्रयत्न केला. भाजपला दहशतवादावरुन राजकारण करण्याची घाणेरडी सवय आहे,' असाही आरोप काँग्रेसने केला.

'हुतात्मा झालेल्या जवानांचे पार्थिव दिल्लीच्या पालम विमानतळावर पोहोचले त्यावेळी मोदींनी तिथे यायला एक तास विलंब केला. कारण, ते झांसीमध्ये राजकारणात व्यस्त होते. हुतात्मा झालेल्या जवानांच्या अंत्ययात्रेत काही भाजप नेत्यांनी केलेले वर्तन लाजिरवाणे होते. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जोरदार उत्तर देण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला पण मोदी राजधर्म विसरले असून, ते सत्ता वाचवण्याच्या मागे लागले आहेत,' असेही सूरजेवाला म्हणाले.

Web Title: PM Modi was busy shooting film in Jim Corbett when nation was mourning Pulwama attack says Congress

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com