VIDEO | पंतप्रधान मोदींचं ट्विटद्वारे आवाहन

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अयोध्येचा निकाल म्हणजे कुणाची हारजीत नाही. 'शांती, एकता, सदभावना ही आपली परंपरा आहे. देशबांधवांनी सलोखा राखावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. ट्विटद्वारे त्यांनी हे आवाहन केलंय. अयोध्येचा निकाल येणार आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी' असं ट्वीट मोदींनी केलं आहे. तसेच 'गेल्या काही महिन्यापासून  या प्रकरणावर  निरंतर सुनावणी होत होती. या काळात समाजातील सर्व वर्गांकडून सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही चांगली गोष्ट होती.

अयोध्येचा निकाल म्हणजे कुणाची हारजीत नाही. 'शांती, एकता, सदभावना ही आपली परंपरा आहे. देशबांधवांनी सलोखा राखावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. ट्विटद्वारे त्यांनी हे आवाहन केलंय. अयोध्येचा निकाल येणार आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी' असं ट्वीट मोदींनी केलं आहे. तसेच 'गेल्या काही महिन्यापासून  या प्रकरणावर  निरंतर सुनावणी होत होती. या काळात समाजातील सर्व वर्गांकडून सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही चांगली गोष्ट होती. कोर्टाच्या निर्णयानंतरही आपल्याला शांतता कायम राखायची आहे. कोर्टाकडून दिला जाणारा निर्णय म्हणजे जय-पराजय नाही. शांती, सद्भावना आणि एकता कायम राखणं ही आपल्या देशाची महान परंपरा आहे. कोर्टाच्या निर्णयानंतरही आपण सर्वांनी मिळून शांतता राखली पाहिजे' असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live