बचत गटांच्या महिलांना मिळणार कर्ज

बचत गटांच्या महिलांना मिळणार कर्ज


औरंगाबाद: जनधन खातं असलेल्या महिलांना खात्यात पैसे नसले तरी ५ हजार रुपयांचं कर्ज देण्यात येईल. त्यामुळे त्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, असं पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. बचत गटातील प्रत्येक महिलेला स्वत:चा रोजगार सुरू करण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत एक लाखाचं कर्ज देण्यात येईल. 

सर्व माताभगिनींना माझा नमस्कार. आज गौरी, महालक्ष्मी विसर्जनाचा दिवस असताना सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल खूप खूप आभार. आज आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती सुद्धा आहे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, अशी मराठीत सुरुवात करत पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. ऑरिस सिटीच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये अनेक कंपन्या येतील. त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांना रोजगार मिळेल, असं मोदींनी सांगितलं. शेंद्रा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑरिक सिटीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. 

समस्या सोडवल्या तर महिलांचाही देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, असं लोहिया म्हणाले होते. लोहिया गेले. त्यानंतर अनेक सरकारे आली आणि गेली. पण या समस्या काही सुटल्या नाहीत. पण आम्ही सत्तेत येताच या समस्या सोडवण्यावर भर दिला असल्याचं मोदी म्हणाले. शौचालय आणि पाणी या महिलांच्या दोन प्रमुख समस्या असल्याचं ज्येष्ठ समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी ७०च्या दशकात संसदेत सांगितलं होतं.  पाण्यासाठी केंद्र सरकारने नवीन मंत्रालय सुरू केलं असून पाण्यासाठी साडे तीन लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 
 

Web Title::  pm narendra modi addressing a mahila sammelan in aurangabad

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com