अखेर कुंभमेळ्याबाबत मोदींनी मौन सोडले

Narendra Modi Appealed to Keep Kumbh Mela Symbolic
Narendra Modi Appealed to Keep Kumbh Mela Symbolic

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी कुंभमेळ्याबाबत Kumbmela मौन तोडले. पंतप्रधान मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि कुंभमेळा संपविण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी ट्विट Tweet करून हे आवाहन केले आहे. PM Narendra Modi Appealed to Keep Kumbh Mela As Symbolic 

"कोरोनातील या संकटात  दोन शाही स्नान झाली आहेत. त्यामुळ या पुढे कुंभला प्रतीकात्मक ठेवावे अशी मी प्रार्थना करतो ." असे मोदी यांनी म्हटले आहे. मी आज आचार्च महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंक गिरीजी यांच्याशी फोनवर चर्चा केली. सर्व संतांच्या आरोग्याबद्दल मी त्यांच्याकडून माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्व ते सहकार्य करत आहेत, त्यासाठी मी त्यांचे आभार मानले असेही मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांनी कुंभ स्नानासाठी लोकांना प्रचंड गर्दी जमवू नये, असे आवाहन केले. स्वामी अवधेशानंद गिरी यांनी आवाहन केले आणि सांगितले की आम्ही  पंतप्रधानांच्या आवाहनाचा आदर करतो!

कुंभमेळ्यात Kumbh Mela कोरोनाची Corona साथ वेगाने पसरत असून महानिर्वाणी आघाड्याचे महामंडलेश्‍वर कपिल देव यांचे कोरोनामुळे काल निधन झाले. तसेच मेळ्यात सहभागी झालेल्या प्रमुख ६८ संतांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  ही बाधितांची संख्या वाढत असल्याने नागा संन्याशींच्या Naga Sadhu मोठ्या आखाड्यांपैकी एक निरंजनी Niranjani आखाड्याने कुंभमेळातून बाहेर पडण्याची घोषणा शुक्रवारी केली. PM Narendra Modi Appealed to Keep Kumbh Mela As Symbolic 

निरंजनी आखाड्याचे चिटणीस महंत रवींद्र पुरी म्हणाले की, हरिद्वार शिबिरातील अनेक संत आणि त्यांच्या अनुयायांना कोरोनासदृश लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे आमच्या आखाड्याच्या संतांनी शनिवारी (ता. १७) कुंभमेळ्याची सांगता करण्याचा निर्णय घेतला आहे.

हरिद्वार महाकुंभ सुरू झाल्यापासून सुमारे ७० ज्येष्ठ साधू कोरोना पॉझिटिव्ह Corona Positive झाले आहे. ही संख्या वाढतच चालली आहे. मेळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. १५) ३३२ जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. कुंभमेळ्यात सहभागी झाल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची कोणतीही नोंद प्रशासनाकडे नाही. बुधवारी (ता.१४) १३ हजार ४१५ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ११९ पॉझिटिव्ह होते. सोमवार (ता.१२)पासून आतापर्यंत झालेल्या ७९ हजार ३०१ चाचण्यांपैकी ७४५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com