‘मोदींवरील चित्रपट युवकांसाठी प्रेरणादायी’

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 जानेवारी 2019

मुंबई - ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या चित्रपटातून राजयोगी व्यक्तित्व असलेल्या वैश्विक नेत्याचे जीवन जगासमोर येणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले. लिजंड ग्लोबल स्टुडिओ प्रस्तृत ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. 

 कार्यक्रमाला चित्रपटाचे निर्माते व अभिनेते सुरेश ओबेरॉय, संदीप सिंग, चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेता विवेक ओबेरॉय आणि दिग्दर्शक ओमंग कुमार उपस्थित होते. या चित्रपटाचे पोस्टर एकाच वेळी तेवीस भाषांत प्रदर्शित होणार आहे.

या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, की भारताने पंतप्रधान मोदी यांच्या रूपाने या युगातील वैश्विक असे नेतृत्व जगाला दिले आहे. त्यामुळे असा चित्रपट बनविणे हासुद्धा एक मोठा विचार आहे. भारतातील युवा पिढीकडे मोठी क्षमता आहे. पण त्यांना गरज आहे, ती प्रेरक जीवन दर्शनाची. मोदी यांनी गरिबीतून येऊन संघटन कौशल्याच्या बळावर चहा विक्रेता ते मोठा राजकीय नेता ते पंतप्रधानपद अशा वाटचालीतून युवा पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. त्या अर्थाने ते राजयोगी आहेत. त्यांच्यामध्ये राजा आणि योगीत्व, असा संयोग आहे.

Web Title: PM Narendra Modi Movie

संबंधित बातम्या

Saam TV Live