मोदींच्या भाषणाची सुरवात मराठीत, शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांना वंदन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली.

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली.

नरेंद्र मोदी आज (मंगळवार) कल्याणमध्ये मेट्रो 5 मार्गाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांना यावेळी मराठीतून भाषणाची सुरवात केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित होते. मुंबईचे विशाल हृदय असून, ते देशाला सामावून घेते, असे मोदींनी म्हटले आहे. 
 
मोदी म्हणाले, की महाराष्ट्राच्या भूमीने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे अशी अनेक रत्ने दिली आहेत. महाराष्ट्राच्या या सर्व महामानवांना मी प्रणाम करतो. आशा-आकांक्षा पूर्ण करणारी माझी भूमी असून, मुंबई देशाचे स्वप्न पूर्ण करणारी भूमी आहे. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.

Web Title: PM Narendra Modi speak Marathi in kalyan


संबंधित बातम्या

Saam TV Live