नाशिककरांच्या पाण्यात मिसळलं जातंय विष, कोण करतंय नाशिककरांच्या जीवाशी खेळ?

साम टीव्ही
शनिवार, 6 जून 2020
  • नाशिककरांच्या पाण्यात मिसळलं जातंय विष
  • मासे पकडण्यासाठी मुकणे धरणात विषारी औषधांची फवारणी
  • प्रदूषित पाण्यामुळे नाशिककरांचं आरोग्य धोक्यात
  • कोण करतंय नाशिककरांच्या जीवाशी खेळ?

नाशिककरांच्या पाण्यात विष मिसळलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कोण मिसळतंय हे विष ?.. तुम्हीच पाहा.

नाशिकररांच्या पाण्यात स्वार्थासाठी विष मिसळलं जातंय. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुकणे धरणात मासेमारी करण्यासाठी विषारी रसायन आणि द्रव्यांचा वापर केला जातोय. धरणातील पाण्यात मोठ्या प्रमाणात झिंगा जातीचे मासे आहेत. त्यामुळे अवैधपणे मासेमारी करणाऱ्या काही समाजकंटकांकडून मासे पकडण्यासाठी रासायनिक कीटकनाशके आणि विषारी द्रव्यांचा वापर केला जातोय.

याचं मुकणे धरणातून नाशिक शहरासाठी दररोज 125 एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे नाशिककरांच्या आरोग्यालाचं धोका निर्माण झालाय. 

याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांनी धरणात अवैधपणे मासेमारी करणाऱ्या दोघा समाजकंटकांना अटक केलीय, तर अन्य दोघे फरार झालेत. 

स्वार्थासाठी धरणाच्या पाण्यात विष मिसळणाऱ्या या समाजकंटकांचा हा उद्योग इथेच थांबत नाही. विषारी द्रव्यांचा अंश असलेल्या माशांची बाजारात सर्रासपणे विक्रीही केली जातेय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज आहे. शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुकणे धरणाची सुरक्षादेखील बळकट करणं तितकंच गरजेचं आहे..
 


संबंधित बातम्या

Saam TV Live