वास्तुपूजनाच्या जेवणातून विषबाधा प्रकरण, अखेर आयोजकावर गुन्हा नोंद

bhandara
bhandara

भंडारा : लॉकडाऊन Lockdown काळात वास्तुपूजन Vastupuja आयोजित करत जेवणाचा थाट मांडने अखेर भंडारा Bhandara जिल्ह्यातील कौथुरना गावातील 'त्या' घर मालकाला भारी पडले आहे.  Poisoning case from Vastupujan meal finally a crime recorded against the Organizer 

वास्तुपूजा जेवणातून Meal 108 लोकांना झालेल्या विषबाधा Food Poisoning प्रकरणी वास्तुपूजा आयोजक घरमालक गजानन खोकले यांच्या विरुद्ध वरठी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

कौथुरना Kauthurna गावातील गजानन खोकले यांच्या घरी बुधवारी वास्तु पूजनाचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 12 गावातील तब्बल 200 लोक ह्या कार्यक्रमात अनधिकृतपणे हजर राहत जेवण करून गेले. Poisoning case from Vastupujan meal finally a crime recorded against the Organizer 

जेवणानंतर लोक घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी लोकांना सकाळी अचानक जुलाब, मळमळ , उलट्या होऊ लागल्या. लागलीच लोकांची गर्दी कौथुरना प्राथमिक केंद्रात होऊ लागली. त्यानंतर तपासात वास्तुपूजा जेवणातून हा प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. तब्बल 108 लोकांना जेवणातून विषबाधा झाली. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भंडाऱ्यातुन वैद्यकीय पथक गावात दाखल झाले. या प्रकरणात तब्बल 108 लोकांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले असून सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. Poisoning case from Vastupujan meal finally a crime recorded against the Organizer

हे देखील पहा - 

लॉकडाऊन असताना अनधिकृतपणे कार्यक्रम आयोजित केल्या प्रकरणी घरमालक गजानन खोकले यांच्यावर  कलम 109/21, 270, 188 (34 ) आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपस वरठी पोलिस करीत आहेत. 

Edited By : Krushnarav Sathe  
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com