शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांची धडक कारवाई... 

भूषण अहिरे
मंगळवार, 4 मे 2021

संपूर्ण राज्यासह धुळ्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ' ब्रेक द चैन ' या मोहिम अंतर्गत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या तसेच किराणा दुकान व भाजीपाला विक्रेत्यांसाठी सकाळी ७ वाजेपासून ११ वाजेपर्यंत दुकान थाटण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे

धुळे : संपूर्ण राज्यासह धुळ्यात Dhule देखील कोरोनाचा Corona प्रादुर्भाव रोखण्यासाठी ' ब्रेक द चेन ' या मोहिमे अंतर्गत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या तसेच किराणा दुकान व भाजीपाला विक्रेत्यांसाठी सकाळी ७ वाजेपासून ११ वाजेपर्यंत दुकान थाटण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. Police action against shopkeepers violating government rules

परंतु, अत्यावश्यक सेवेत येत नसलेल्या दुकानदारांनी देखील आपली दुकानं थाटली असल्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून पोलिस Police प्रशासन व महानगरपालिका Municipal Corporation प्रशासनातर्फे अशा दुकानदारांना चेतावणी देण्यात आली होती. त्याचबरोबर यापुढे असे दुकान थाटल्यास कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या.

हे देखील पहा -

धुळे महानगरपालिका प्रशासनातर्फे तसेच पोलीस प्रशासनातर्फे प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत दुकाने थाटणार्‍या दुकान मालकांना पोलीस प्रशासनातर्फे ताब्यात घेऊन धडक कारवाई Action सुरू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा दुकान मालकांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. Police action against shopkeepers violating government rules

कोणी लस देता का लस ? असे म्हणत गोंदियात नागरिकांची लसीसाठी भटकंती

नियमांचे उल्लंघन करीत आपली दुकान उघडल्यामुळे नागरिकांची बाजारपेठेमध्ये व शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिस प्रशासनाने ही धडक मोहीम सुरू केली असल्याचे धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live