पोलीस आणि एफडीएने दोन ठिकाणी मारले छापे: २२०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा जप्त

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

मुंबईतील अंधेरीतील मरोळ आणि मरीन लाइन्स परिसरात मुंबईत पोलीस Police आणि एफडीएने रेमडेसिव्हिर इंजेक्शन साठवून ठेवल्याच्या माहितीप्रकारणी छापा मारला. छापे मारून २२०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या कुपी जप्त केल्या गेल्या आहेत.

मुंबई: अंधेरीतील मरोळ Marol आणि मरीन लाइन्स Marine Lines परिसरात मुंबईत पोलीस Police आणि एफडीएने FDA रेमडेसिव्हिर इंजेक्शन Remdesivir Injection साठवून ठेवल्याच्या माहिती प्रकारणी छापा Raid मारला. छापे मारून २२०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या कुपी जप्त केल्या गेल्या आहेत. हे सर्व इंजेक्शन सध्या एफडीएकडे सोपवण्यात आल्या असून, ते हॉस्पिटल्सना देण्यात येणार आहेत असे सांगण्यात आले आहे. Police and FDA raided two places in Mumbai

मुंबईत करोना Corona रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा सर्वत्र जाणवत आहे. ते मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धडपड सुरू आहे. दुसरीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार Black Market सुरू आहे. साठेबाज रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन चढ्या दराने विकून इंजेक्शनचा काळ बाजार सुरु असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.

त्याचवेळी मुंबईत असलेल्या काही औषध वितरकांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा प्रचंड साठा करून ठेवल्याची माहिती त्यांच्या खबऱ्यांमार्फत मुंबई पोलीस आणि एफडीएला मिळाली होती. त्यानुसार, एफडीएच्या पथकाने आणि मुंबई पोलीसने योजना आखत मुंबई उपनगरांतील दोन ठिकाणी छापे मारले.

मुंबई पोलीस आणि एफडीएच्या पथकाने अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथे छापा मारला. मरोळ येथून रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तब्बल २००० व्हायल्स जप्त करण्यात पथकाला यश आले आहे. तर दुसऱ्या ठिकाणी न्यू मरीन्स लाइन्स येथेही एका वितरकाशी संबंधित असणाऱ्या ठिकाणी पथकाने छापा मारला. तेथून रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या २०० व्हायल जप्त केल्या गेल्या आहेत. परस्पर विक्री करण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनवर बंदी घातली असताना ही, काही वितरकांनी त्याचा अवैध, बेकायदेशीर साठा करून ठेवला होता. परंतु पोलिसांनी हा साठा जप्त केला असून, एफडीएच्या ताब्यात सर्व साठा देण्यात आला आहे. हे संबंधित इंजेक्शन योग्य त्या ठिकाणी गरज असलेल्या हॉस्पिटलना देण्यात येतील, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live