बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड

दिनू गावित
रविवार, 23 मे 2021

 बनावट लग्न लावून आठ दिवसाच्या आतच पैसे व दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या टोळीतील वधूसह इतर चौघांना शहादा पोलिसांनी सापळा रचून बेटावद येथे गजाआड केले आहे.

नंदूरबार : विवाह म्हणजे नुसतेच दोन जीवांचे मनोमिलन नसून दोन परिवारांचे विश्वासाचे नातं होय, पती-पत्नी लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने गुंफत असतात, अशातच जर विश्वासघात होत असेल व नात्यातील गुंतागुंत होत असेल तर मात्र सारेच असह्य होते असाच प्रकार घडला आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाणा गावातील सैंदाणे परिवारासोबत. Police Arrested Gang in Nandurbar making false Marriages

बनावट लग्न लावून आठ दिवसाच्या आतच पैसे व दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या टोळीतील वधूसह इतर चौघांना शहादा पोलिसांनी सापळा रचून बेटावद येथे गजाआड केले आहे.

हे देखिल पहा

या विषयी सविस्तर वृत्त असे की मंदाणा येथील भूषण सैंदाणे याचा विवाह एका दलालाच्या मध्यस्थीने हिंगोली येथील सोनू राजू शिंदे या मुलीशी लावून देण्यात आला. मुलीशी लग्न लावून देण्यासाठी १ लाख ३० हजार रुपये बाबाराव आमले रा. औरंगाबाद या दलालाने  सैंदाणे परिवाराकडून घेतले. लग्नाच्या सात दिवसानंतर वधुने दागिने व रोकड रकमेसह पोबारा केला म्हणून सदरची तक्रार सैंदाणे परिवाराने पोलीस स्टेशन असलोद येथे केली होती.

लाॅकडाऊन वाढविण्याबाबत राजेश टोपेंनी दिले हे संकेत

यानंतर बेटावद येथील सैंदाणे यांचे नातेवाईकाने तुझ्या पत्नी सारख्या दिसणाऱ्या मुलीचा विवाह बेटावद येथील कपीलेश्वर मंदिरावर होत असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे शहादा पोलीस  निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक परदेशी व शिपाई साळुंखे यांनी बेटावद जवळील पडद्यावर येथे सापळा रचत बनावट लग्न करून फसवणूक करणाऱ्या सोनू शिंदे व तिच्या सहकारी टोळीला जेरबंद केले आहे.

दुसरे बनावट लग्न सुनील पाटील रा. सुरत याच्या सोबत करुन त्याला  २ लाख रुपयांचा गंडा घातला असून  या टोळीचे मुख्य सूत्रधार सोनू शिंदे तिच्यासोबत रवींद्र गोपाळ रा.कुंभारी ता.जामनेर,योगेश साठे रा.अकोला व पूजा साळवे रा.हिंगोली याना ताब्यात घेतले आहे. Police Arrested Gang in Nandurbar making false Marriages

पोलीस ही कारवाई करीत असताना गर्दीतुन  सोनूची आई वंदनाबाई तिचा भाऊ भैरव व प्रीती कांबळे हे तिघे स्कारपीओ गाडीने घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याची नोंद शहादा पोलीस स्टेशन येथे  करण्यात आली आहे,घटनेचा पुढील  तपास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live