अकोल्यात रेमडेसिविरचा काळा बाजार; सहा जणांना अटक

Akola Police Arrested Six for Black Marketting of Remdisivir
Akola Police Arrested Six for Black Marketting of Remdisivir

अकोला : रेमडेसिविरचा Remdisivir काळा बाजार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. दीड हजार रुपयांत विकल्या जाणारे एक इंजेक्शन २५ हजार रुपयांमध्ये ब्लॅकने विकताना पोलिसांनी Police दोघांना रंगेहाथ पकडले. तर याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Police Arrested Six for Black Marketing of Remdesivir injections

कोरोनाच्या Corona गंभीर रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्यात रेमडेसिविरची मागणी वाढत आहे. मागणीच्या तुलनेत रेमडेसिविरचा पुरवठा कमी होत असल्याने जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याच संधीचा लाभ घेत काही लोक रेमडेसिविरचा काळा बाजार करत असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने LCB केलेल्या कारवाईतून उघडकीस आला. 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत  तीन रेमडेसिविर इंजेक्शनसह चार जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, कोविड उपचारासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिविर इन्जेक्शनचा जिल्ह्यात काळा बाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरात सापळा रचून रुग्णाचा बनावट नातेवाईक म्हणून संबंधित व्यक्तीला रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली. दरम्यान २५ हजार रुपयांना एक, या प्रमाणे ७५ हजार रुपयांत तीन रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देणार असल्याचे आरोपीने सांगितले.  

ठरलेल्या वेळेत ठरलेल्या जागेत आरोपीने ७५ हजार रुपयांना तीन रेमडेसिविर आणून दिले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले. या प्रकरणाची पोलिस चौकशी करीत आहेत. पोलिसांनी रतनलाल प्लॉट चौकात सापळा रचला होता. यावेळी ज्याच्याकडून इंजेक्शन घ्यायचे होते त्याला बोलावले. पंचवीस हजार रुपयाला एक इंजेक्शन घ्यायचे ठरले. त्यानुसार तीन इंजेक्शन ७५ हजार रुपयात घेतले व पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. Police Arrested Six for Black Marketing of Remdesivir injections

तो आरोपी रतनलाल प्लॉट चौकातील ‘ऑर्बिट’ हॉस्पिटल Hospital नजीक असलेल्या श्रीराम मेडिकल स्टोअर्स Medical Stores मध्ये काम करतो. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने याच मेडिकल मधून इंजेक्शन जरी आणले असले तरी त्या मेडिकलला इंजेक्शन ठेवण्याचा परवाना नाही. त्यामुळे ही इंजेक्शन जर त्या मेडिकल मध्ये असतील तर त्या मेडिकलमध्ये आले कुठून याचा पोलिस तपास करीत आहेत.

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com