पोलिस भरतीत मराठा आरक्षणाचं काय? पोलिस भरतीवर मराठा नेते नाराज

साम टीव्ही
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020
  • पोलिस भरतीत मराठा आरक्षणाचं काय?
  • पोलिस भरतीवर मराठा नेते नाराज
  • राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई : आधीच मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय. राज्यभर आंदोलनं सुरु आहेत. सरकारी स्तरावर बैठका घेतला जातायत. कायदेशीर लढाई सुद्धा बाकी आहे. अशातच सरकारने पोलिस खात्यात मेगा भरती जाहीर केलेय. ज्यामुळे मराठा समाज नाराज झालाय.

पोलिस भरतीत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा संघटना आक्रमक झाल्यात. तर मराठा नेत्यांनीही सरकारला धारेवर धरलंय.

राज्यभर सुरु असलेली आंदोलनं पाहता आक्रमक झालेला मराठा समाज आता यावर काय भूमिका घेणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. पोलिस भरतीची घोषणा करुन बेरोजगारांना दिलासा देत असतानाच, मराठा समजालाही दुखावून चालणार नाही. त्यामुळे राज्य सरकारही आरक्षणाची गणितं जुळवू लागलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live