प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाचा जल्लोष करणे कार्यकर्त्यांना भोवले

जयेश गावंडे
बुधवार, 12 मे 2021

वंचित बहुजन आघाडीचे Vanchit Bahujan Aghadi सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांचा वाढदिवसाचा Birthday जल्लोष करणे कार्यकर्त्यांना भोवले आहे. या प्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे Vanchit Bahujan Aghadi सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांचा वाढदिवसाचा Birthday जल्लोष करणे कार्यकर्त्यांना भोवले आहे. या प्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर एका पोलीस Police कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वाढदिवस जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Police Booked Vanchit Party workers who celebrated Prakash Ambedkar Birthday

या जल्लोषाचे व्हिडिओ व्हायरल\झाल्यानंतर डाबकी रोड पोलिसांनी वाढदिवस आयोजित करणाऱ्यांसह सहभागी असणाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अकोल्यातील जुने शहरातील भीमनगरमध्ये नागरिकांनी एकच गर्दी करून फटाके फोडून प्रचंड आतषबाजी केली. संचारबंदीच्या नियमांचे ते उल्लंघन असल्याने डाबकी रोड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर हा सर्व प्रकार एका पोलिस कर्मचाऱ्याच्या  उपस्थितीत झाल्याने अश्विन शिरसाट या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरच्या जवळ १० मे रोजी रात्री केक कापून जल्लोष करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतषबाजी लक्षवेधक ठरली. भीमनगरमध्ये गर्दी दिसून आल्याने आणि फटाक्यांची आतषबाजी होत असल्याचे पाहून डाबकी रोड पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते. या वेळी तेथे नागरिकांची मोठी गर्दी होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत आठ दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live