जालन्यात कोविड रुग्णालयासमोर पोलीस चौकीची स्थापना...

साम ब्युरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

जिल्हा कोविड हॉस्पिटल (Covid Hospital) समोर रुग्णांचे नातेवाईक तुडुंब गर्दी असल्याने हॉस्पिटल समोरच पोलीस चौकी उभारण्यात आली असून ठराविक नातेवाईकांनाही हॉस्पिटलसमोर उभे राहण्यास मज्जाव करण्यात येत आहे​

जालना :   जिल्ह्यात निर्बंध लाऊनही लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने कोरोना (Corona) रुग्णांच्या मृत्युदरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्ह्यात (Jalana) कोविड रुग्णालय ही फुल्ल झाली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह जिल्हा आरोग्य विभागाच्या चिंतेत मोठी भर पडली. Police Chowky installed in front of Jalana Covid Hospital

महिना भरात जिल्ह्यात कोविड रुग्णाची  वाढती रुग्ण संख्या जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. ठिकठिकाणी निर्बंध लावण्यात आले खरे पण यश कुठेही आलं नाही.उलट कोरोना बाधितांचा आकडा वाढला, शिवाय कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरातही भरमसाठ वाढ झाली असून,फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या या पाच आठवड्या जिह्यात कोरोनाचा हाहाःकार माजला, शहराबरोबर गावखेड्यापर्यंत रुग्ण आढळून येत असल्याने वाड्या,तांड्यावर ही कोरोनाचा कहर वाढला आहे.

गेल्या पाच आठवड्यात तब्बल ११ हजार नव्या रुग्णाची भर पडली,त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २६ हजार ८७४ वर पोहचली आहे,त्यातच या पाच आठवड्यात १०२ कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने जिल्ह्यात बळींची संख्या ५०३ वर पोहचली,

वाढत्या कोरोनाच्या प्रादूर्भावासमोर आरोग्ययंत्रणा (Health) प्रत्यक्ष अपयशी ठरली आहे.जिल्हा शासकीय रुग्णालय (Hospital) हे ४०० खाटांचे असून हे रुग्णालयात पुर्णक्षमतेने भरले असून आता उपचारासाठी येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करायचे कुठे असा मोठा प्रश्न आरोग्य विभागाबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

राज्यात ज्या पद्धतीनं रुग्ण संख्या वाढत आहे,त्याच प्रमाणे त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती आणि सोयीसुविधाची उपलब्धता निपुरी पडत आहे, सध्या जिल्ह्यात ४ हजार ६६ सक्रीय रुग्ण असल्याने शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील बेडस फुल्ल झाल्याने सोयीसुविधाची उपलब्धता निपुरी पडत आहे . त्यामुळे रुग्ण संख्या दिवसा गणिक वाढली तर उपचार करायचे कसे असा प्रश्न आत्ता आरोग्य यंत्रणेच्या समोर उभा राहिला आहे. Police Chowky installed in front of Jalana Covid Hospital

जिल्हा कोविड हॉस्पिटल (Covid Hospital) समोर रुग्णांचे नातेवाईक तुडुंब गर्दी असल्याने हॉस्पिटल समोरच पोलीस चौकी उभारण्यात आली असून ठराविक नातेवाईकांनाही हॉस्पिटलसमोर उभे राहण्यास मज्जाव करण्यात येत आहे.सोबत हॉस्पिटल समोर होणारी गर्दी टाळण्यासाठी रुग्णालयाच्या गेट बाहेर दोरखंड बांधून नातेवाईकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

मास्क वापरा, निर्बंध पाळा अशी याचना राज्यसरकार सुरुवातीपासूनच करतं आहे. मात्र लोक कोणत्याही परिस्थितीत ऐकायला तयार नाही.त्यामुळे जिल्हा पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या (Lock Down) उंबरठ्यावर येऊन पोहचलाआहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन काय निर्णय घेत याकडे पुन्हा एकदा सर्वच  लक्ष लागलेलं आहे.

Edited By - Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live