पोलीस पाटील बहिष्कार प्रकरणी अखेर 'त्या' गुन्हेगारांवर गुन्हा दाखल

akola news
akola news

अकोला - जिल्ह्यातील पातुर Patur तालुक्यातल्या सोनूना या गावात चक्क पोलीस पाटील Police Patil कुटूंबावरच बहिष्कार Boycott टाकल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. अखेर या प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हे दाखल Case Filed करण्यात आले आहेत.  सोनूना हे गाव अतिशय दुर्गम Inaccessible आणि आदिवासी पाड्यात असून गावकऱ्यांनी गावात दबदबा असलेल्या लोकांच्या दबावाखाली येत पोलीस पाटलावर बहिष्कार टाकला होता. गावकऱ्यांनी पोलीस पाटील कुटुंबाचे किराणा Grocery, दळण आणि पाणी पूर्णतः बंद केले होते. धक्कादायक म्हणजे गावातील कुणी बहिष्कृत पोलिस पाटलाच्या कुटुंबाशी बोलल्यास दंड असा तुघलकी निर्णय घेण्यात आला होता.  Police finally file a case against those criminals in Patil boycott case

सोनूना गावच्या ३० वर्षापासुन पोलीस पाटील पदावर कार्यरत असलेल्या रमेश नारायण कदम यांच्यासह त्यांच्या परिवारातील त्यांच्या पत्नी शशिकला रमेश कदम आई गंगुबाई नारायण कदम, मुलगी गोकूळा कदम, रीना रमेश कदम आणि मुलगा प्रमोद रमेश कदम या सर्वांवर गावातील काही समाज धुरीणांच्या दबावाखाली येऊन गावकऱ्यांनी पोलीस पाटलांवर बहिष्कार टाकला होता.

हे देखील पहा -

गेल्या पंधरा दिवसांपासून गावातील कुणीही पोलीस पाटलांच्या परिवाराशी बोलत नाही त्याबरोबरच गावातील सार्वजनिक स्थळावरून पिण्याचे पाणी भरू दिले जात नव्हते, गावातील दुकानदार आणि पीठ गिरणी वाल्याला दळून देऊ नये असा तुघलकी फतवा गावातील काही समाजधुरीणांनी काढला होता आणि जर गावातील कोणी पोलिस पाटलाच्या कुटुंबा सोबत बोललं तर दंड केला जाईल असा फतवा देखील काढला होता. Police finally file a case against those criminals in Patil boycott case

दरम्यान   यासंदर्भात पोलीस पाटील असलेले रमेश कदम यांनी पोलीस स्टेशनला तीन वेळा फिर्याद दिली मात्र पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.  त्यामुळे जगावे की मरावे असा प्रश्न कदम कुटुंबीयांवर ओढवला होता. अखेर साम टिव्हीने याची बातमी दाखवल्यानंतर आज पोलीस प्रशासनाला जाग आली अन गावातील 12 जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com