लुटमारीच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला रंगेहाथ पकडले.. 

जयेश गावंडे
मंगळवार, 4 मे 2021

लुटमारीच्या प्रयत्नातील टोळीला अकोला पोलिसांनी पातूर रोडवर पकडले आहे. यात एका महिलेसह पाच जणांचा समावेश आहे. सर्व आरोपी जळगाव जामोद तालुक्यातील आहेत

अकोला : लुटमारीच्या प्रयत्नातील टोळीला अकोला Akola पोलिसांनी पातूर Patur रोडवर पकडले आहे. यात एका महिलेसह पाच जणांचा समावेश आहे. सर्व आरोपी जळगाव Jalgaon जामोद तालुक्यातील आहेत. यांच्यावर जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवन्याची प्रक्रिया चालू आहे. Police have nabbed the looting gang   

यामध्ये जळगाव जामोद वाडी येथील राहणारा विलास प्रकाश काले, कैलास धुंदन पवार, विजय कैलास पवार, सूरज विजू पवार व शीतल विलास भोसले यांचा समावेश आहे. हे त्यांच्या गाडीत संशयास्पद स्थितीत वाटले.

हे देखील पहा -

 

हे त्यांच्या गाडीत संशयास्पद स्थितीत वाटले. त्यामुळे पोलिसांनी Police त्यांची कसून चौकशी केली असता. त्यांच्याकडे बॉटलमध्ये पारा मर्क्युरी ऑक्साइड, बॉटल अँसिड, चाकू, दोर, मिरची पावडर, पाच मोबाइल अशा वस्तू त्यांच्याकडे सापडले आहे. 

अमरावतीत महसूल विभागाच्या रक्तदान अभियानाला भरभरून प्रतिसाद

हे आरोपी दरोडा, जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत आढळले. अकोल्याच्या पोलीस पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे. या आरोपीवर बुलढाणा Buldhana, मलकापूर Malkapur, नांदुरा Nandura, जळगाव, जामोद येथेही त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे आढळले आहे. या आरोपी विरूद्ध जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आले आहे.

Edited By- Digambar jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live