पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात पोलिसांचा तपास सुरू |

साम टीव्ही
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलिस तपास करत नाहीत असा आरोप विरोधक करत असले तरी वस्तूस्थिती तशी नाही. पूजाच्या मृत्यूची कारणं शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी वेगानं तपास सुरु केलाय.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात पोलिस तपास करत नाहीत असा आरोप होत होता. पण हे आरोप बिनबुडाचे असल्याचं स्पष्ट झालंय. पुणे पोलिसांची टीम यवतमाळमध्ये चौकशीसाठी गेलीय. तर स्वतः पोलिस महासंचालक पुण्यावर लक्ष ठेऊन आहेत.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलिस तपास करत नाहीत असा आरोप विरोधक करत असले तरी वस्तूस्थिती तशी नाही. पूजाच्या मृत्यूची कारणं शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी वेगानं तपास सुरु केलाय.

स्वतः पोलिस महासंचालक हेमंत नगराळे हे या तपासावर लक्ष ठेऊन असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांची पुणे भेट याचाच एक भाग असल्याचं सांगण्यात येतंय. त्याचवेळी पुणे पोलिसांची एक टीम यवतमाळच्या वसंतराव नाईक मेडिकल कॉलेजमध्ये गेलीय. तिथल्या अधिष्ठात्यांनी याला दुजोरा दिलाय.

 पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु आहे. कोणताही तक्रारदार नसताना पोलिसांचा तपास सुरु आहे. या प्रकरणात पोलिस आता  काय निष्कर्ष काढतात याबाबत उत्सुकता आहे.
 
फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live