गडचिरोलीत पोलिसांकडून १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

संजय तुमराम
शुक्रवार, 21 मे 2021

येथील पैदी जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांत चकमक सुरु असून या चकमकीत १३ नक्षलवादी मारली गेल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे

गडचिरोली : येथील पैदी जंगलात पोलिस Police व नक्षलवाद्यांत Naxalites चकमक सुरु असून या चकमकीत १३ नक्षलवादी मारली गेल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. ताज्या वृत्तानुसार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil नागपूरहून गडचिरोली कडे रवाना झाले आहेत. Police Killed Thirteen Naxals in Gadchiroli Etapalli Area

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटमी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये पहाटेपासून ही चकमक सुरु आहे. पोलिसांचे सी-६० चे कमांडो Commondo जवान नक्षल विरोधी अभियान राबवत होते. या भागात कसनसुर नक्षल दलम कार्यरत असल्याची माहिती सुरक्षा दिलांना मिळाली होती.  

काही दिवसांपूर्वीच येथील पोलीस चौकीवर नक्षलवाद्यांनी राॅकेट लाँचरने हल्ला केला होता. पण, या हल्ल्यात कोणतंही नुकसान झालं नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी नक्षलवादविरोधी अभियान राबवलं. या अभियानाअंतर्गतच येथे गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळच्या दरम्यान ही चकमक झाली. नक्षलवाद्यांचे अनेक म्होरके यामध्ये मारले गेल्याची माहिती आहे. Police Killed Thirteen Naxals in Gadchiroli Etapalli Area

कोविड रुग्णालयातील बाऊन्सर प्रकरणात गृहराज्यमंत्री नाराज

एटापल्ली तालुक्यात कोटमी-पैदीच्या जंगलात अजुनही ही चकमक सुरु आहे. घनदाट जंगलाच्या या भागात काल रात्रीपासून दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live