पोलिस अधिकाऱ्यानं चोरलं तक्रारदार महिलेचं घड्याळ

गोपाळ मोटघरे
शनिवार, 1 मे 2021

पिंपरी पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच चक्क तक्रारदार महिलेच्या घरातील महागडे घड्याळ Wrist Watch चोरल्याचा तसेच तिच्याशी लगट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

पिंपरी : ही बातमी आहे पिंपरी - चिंचवड Pimpri Chinchwad पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारी, पिंपरी पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच चक्क तक्रारदार महिलेच्या घरातील महागडे घड्याळ Wrist Watch चोरल्याचा तसेच तिच्याशी लगट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Police officer in Pimpri Suspended for Theft

प्रशांत रेळेकर असं महागडी घड्याळ चोरणाऱ्या सहायक पोलिस Police निरीक्षक अधिकाऱ्याचं नाव आहे. प्रशांत रेडेकर हा एका तक्रारदार महिलेला आपल्या गाडीत घेऊन तिच्या घरी सोडायला गेला. दरम्यान प्रवासात त्याने तक्रारदार महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

प्रशांत रेडेकर इथेच थांबला नाही. पुढे जाऊन पुढे कॉफी पिण्याच्या बनाव करून त्याने तक्रारदार महिलेच्या घरात प्रवेश मिळविला. तक्रारदार महिलेच्या घरात प्रवेश मिळविल्या नंतर  प्रशांतने तक्रारदार महिलेचे अॅपल Apple कंपनीचे महागडी घड्याळ चोरले. Police officer in Pimpri Suspended for Theft

ही बाब महिलेच्या लक्षात आल्या नंतर तिने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडीस आला. दरम्यान संबधित आरोपी पोलिस अधिकाऱ्याचं हे कृत्य पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणार असल्याने, चुकीला माफी नाही या न्यायाने  पिंपरी - चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश Krishna Prakash यांनी पोलिस अधिकारी प्रशांत रेळेकरला तात्काळ निलंबित केलं असल्याची माहिती सहायक  पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live