सेवाजेष्ठतेला डावलून पोलिस अधिकाऱ्यांचा बदल्या

संजय जाधव
सोमवार, 31 मे 2021

जयजित सिंह यांच्याबद्दलची एक चौकशी काही दिवसा आधीच सध्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी करून शासनाला अहवाल सादर केल्याची खात्री लायक माहिती आहे.

काल महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) अखेर ठाणे पोलीस (Thane Police) आयुक्तांची निवड केली. जयजित सिंह (Jayjt singh) १९९० बॅच चे आय पीएस अधिकारी नवे आयुक्त असतील. पण राज्य सरकारने सेवा जेष्ठता डावलून अनेक निर्णय घेतले आहे. जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात ज्यांचा कोणी वाली नाही अशा अधिकाऱ्यांचा जेष्ठतेचा विचार सरकारने केला नाही. आणि जयजित सिॅह जरी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी असले तरी त्यांच्या पेक्षा जेष्ठ अधिकाऱ्यांना डावलण्सात आले.(Police officers have been transferred in violation of seniority)

जयजित सिॅह हे असे अधिकारी आहे, ज्यांची एका वर्षात तीन वेळी बदली झाली. पहिल्यांदा जयजित सिंह यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक करण्यात आले. त्यानंतर लगेच देवेन भारती यांची बदली दहशतवादी विरोधी पथकावरून करून त्यांच्या जागी जयजित सिॅह यांची बदली झाली आणि काही महिने जात नाही तोच जयजित सिॅह यांना ठाणे पोलीस आयुक्त पद देण्यात आले. 

हे देखील पाहा

ठाणे अत्यंत महत्वाचे शहर आहे. आणि त्यासाठी अनेक अधिकारी पात्र होते मग जयजित सिंह यांचा नंबर कसा लागला.  जयजित सिॅह यांच्याकडे असे काय होते जे इतर अधिकाऱ्यांकडे नव्हते. १९८९ बॅच चे अनेक अधिकारी होते. त्यापैकी राजेंद्र सिॅह, संजय कुमार वर्मा,  भुषण कुमार उपाध्याय यांच्यासह अनेक अधिकारी होते. तर मग यांचा विचार का झाला नाही. असाच काहीसा भेद सरकारने डी कनकरत्नम यांच्या सोबत ही केला. त्यांची सेवा जेष्ठता असून ही त्यांना डावलले गेले. सध्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना ही असेच डावलले गेले अखेर त्यांना महासंचालक पद द्यावे लागले. 

लसीकरणाची भीती दूर करण्यासाठी आदिवासी तरुणाने अनोखा प्रयत्न

जयजित सिंह यांच्याबद्दलची एक चौकशी काही दिवसा आधीच सध्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी करून शासनाला अहवाल सादर केल्याची खात्री लायक माहिती आहे. या चौकशीचे काय झाले आणि चौकशीचा अहवाल येण्याच्या आधी त्यांना पोलीस आयुक्त करण्यात आले. सध्या पोलीस विभागात नेमक काय सुरू आहे. हे कळणे कठीण झाले आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना का डावलले जात आहे याबाबत सरकार मौन आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live