आता मॉर्निंग, ईव्हीनिंग वॉक कराल तर सावधान

जयेश गावंडे
शनिवार, 17 एप्रिल 2021

आज संचारबंदीचे उल्लंघन करत  मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या  एकूण ६३ जणांवर अकोला पोलिसांनी लॉक डाऊन चे उल्लंघन केल्या कारणाने गुन्हे  दाखल केले आहेत

अकोला : कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी Curfew लावण्यात आली आहे. दरम्यान आज संचारबंदीचे उल्लंघन करत  मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या  एकूण ६३ जणांवर अकोला पोलिसांनी लॉक डाऊन चे उल्लंघन केल्या कारणाने गुन्हे  दाखल केले आहेत. Police Registering Offence against Morning Evening Walkers in Akola

राज्यासह जिल्ह्यात Akola कोरोना रूग्ण मोठया प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे राज्यसरकारने पंधरा दिवसांचे कडक निर्बंध लावले आहेत मात्र तरीही या निर्बंधांचे उल्लंघन करत अनेक जण मुक्त संचार करत आहेत. आज सकाळी अकोला पोलिसांनी Police मॉर्निंग वॉक Morning Walk करणाऱ्या ६३ जणांवर कारवाई केली आहे. अकोल्यात मॉर्निंग ईव्हीनिंग आणि नाईट वॉक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काही तर विनाकारण बाहेर फिरतात कुठल्याही नियमांचे पालन करत नाही अशांवर आता पोलिसांची नजर असणार आहे. 

त्यामुळे यापुढे सकाळी तसेच संध्याकाळी Evening विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास आपल्यावर  गुन्हे Offence दाखल केले जातील.  आज केलेल्या कारवाईमध्ये तरुण मुलांचे प्रमाण जास्त दिसत असून  सर्व पालकांना प्रशासनातर्फे आवाहन आहे की आपल्या मुलांना पुढचे काही दिवस घरीच राहायला सांगावे. Police Registering Offence against Morning Evening Walkers in Akola

तसेच सर्व नागरिकांना प्रशासनातर्फे नम्र विनंती करण्यात येते कि विनाकारण  कोणीही घराच्या बाहेर पडू नका. शासनाच्या नियमांचे पालन करावे. हे सर्व आपल्या सुरक्षिततेसाठी चालले असून सर्वांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे. अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय कोणीही बाहेर पडू नये. असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live