पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचा मेसेज कंट्रोल रूमच्या ग्रुप वर.....

संदीप नागरे
मंगळवार, 20 एप्रिल 2021

हिंगोलीत  पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस दलातील कंट्रोल रूमच्या  व्हॉटसअप ग्रुप  वर आत्महत्या  करत असल्याचा मेसेज पाठविल्याने एकच खळबळ उडाली.

हिंगोली - हिंगोलीत hingoli पोलीस  police कर्मचाऱ्याने पोलीस दलातील कंट्रोल रूमच्या control room व्हॉटसअप ग्रुप whatsapp वर आत्महत्या suicide करत असल्याचा मेसेज पाठविल्याने एकच खळबळ उडाली आहे, शंकर जाधव shankar jadhav असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते हिंगोली पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या विशेष पथकात तैनात आहेत. हा मेसेज त्यांनी १८ एप्रिल रोजी पाठविल्याची माहिती समोर आली आहे. police sent a suicide message to the control room group

या मेसेज नंतर पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कर्मचाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्र भर शोध न लागल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली होती. त्या कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला रात्रभर धावपळ करावी लागली.

रात्री उशिरा वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शंकर जाधव यांचा शोध घेण्याच्या सूचना देत दोन पथके तत्काळ रवाना केली. जाधव यांच्या मोबाईल लोकेशन वरूनही शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोबाईल बंद असल्याने ते कुठे असणार याचा अंदाज येत नव्हता. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. 

मात्र अखेर हा पोलीस कर्मचारी खानापूर चित्ता येथील त्यांच्या एका नातेवाईकांकडे सापडल्याने शोध पथकाने सुटकेचा नि: श्वास  सोडला, दरम्यान जाधव यांनी हा मेसेज कोणत्या कारणाने पाठविला या मागचे नेमके कारण काय आहे याचा पुढील तपास पोलीस घेत आहेत. police sent a suicide message to the control room group
 

Edited by - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live