मध्यप्रदेशात राजकीय पेच | दिग्विजय सिंहांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

सोनाली शिंदे
बुधवार, 18 मार्च 2020

बंगळुरु - काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांना बंगळूरू पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतलं. मध्य प्रदेशचे काँग्रेसचे 21 आमदार बंगळुरूच्या रामाडा हॉटेलमध्ये आहेत. या आमदारांना जबरदस्तीनं डांबून या हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केलाय.

 

बंगळुरु - काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांना बंगळूरू पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतलं. मध्य प्रदेशचे काँग्रेसचे 21 आमदार बंगळुरूच्या रामाडा हॉटेलमध्ये आहेत. या आमदारांना जबरदस्तीनं डांबून या हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केलाय.

 

बंगळुरुतील एका हॉटेलमध्ये काँग्रेस आमदारांना भेटण्यासाठी दिग्विजय सिंह हॉटेलमध्ये जात होते. त्यावेळी त्यांना अडवण्यात आलं. यानंतर दिग्विजय सिंह आपल्या कार्यकर्त्यांसह धरणं आंदोलनाला बसले. पोलिसांनी त्यांना याठिकाणाहून दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना धक्काबुक्कीही झाली. दरम्यान ही दडपशाही चालू देणार नाही असं दिग्विजय सिंह यांनी म्हंटलं आहे. मी शांततेच्या मार्गाने आमदारांना भेटण्यासाठी आलो होतो, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

 

दरम्यान, राज्यसभेतही या घटनेचे पडसाद उमटले. काँग्रेस खासदारांनी दिग्विजय सिंह यांना ताब्यात घेण्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यानंतर बराच गदारोळ झाला. यानंतर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

 

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सोडचिट्ठीनंतर मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अडचणीत आलं आहे. बंडखोरीचा फटका काँग्रेसला बसला असून आता कमलनाथ सरकारला अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. तूर्तास ही अग्निपरीक्षा टळली असली, तर मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यपाल यांच्यातही सध्या लेटर वॉर सुरु असल्यानं एकूण राजकारण ढवळून निघालं आहे. 

 

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचं पत्र - 

 

 

madhya pradesh kamalnath jyotiraditya shinde ncp congress politics india sonia rahul gandhi digvijay singh rajyasabha parlament india

 

 

 

काँग्रेसच्या बंडखोर 22 आमदारांना कर्नाटकच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहीलंय. या पत्रातून त्यांनी कोणत्याही काँग्रेस नेत्याला आम्हाला भेटण्यासाठी पाठवू नये, त्यासाठी सुरक्षेची तजवीज करावी, अशी विनंतरी करण्यात आली आहे. 

 

123

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live