आत्महत्येचा संदेश अधिक्षकांना पाठविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे कोरोनाने निधन

संदीप नागरे
गुरुवार, 29 एप्रिल 2021

मला रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याची खंत व्यक्त करत पोलीस अधीक्षकांना आपला स्वतःचा ऑडिओ संदेश पाठवून रुग्णालयाच्या छतावरून उडी घेत आत्महत्या करत असल्याचे, सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे आज सकाळी कोरोनाने दुःखद निधन झाले आहे

हिंगोली : पोलीस Police कर्मचारी असताना, मी जनतेची वाईट काळात सेवा केली. मात्र मला रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याची खंत व्यक्त करत पोलीस अधीक्षकांना आपला स्वतःचा ऑडिओ Audio संदेश पाठवून रुग्णालयाच्या छतावरून उडी घेत आत्महत्या Suicide करत असल्याचे, सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे आज सकाळी कोरोनाने Corona दुःखद निधन Dead झाले आहे. Policeman Sachin Ingole dies of corona

पोलीस कर्मचारी सचिन इंगोले Sachin Ingole हे गोरेगाव Goregaon पोलीस स्थानकात नेमणुकीस होते. हिंगोली Hingoli शहर पोलीस स्थानकात नेमणुकीस असताना सचिन इंगोले यांनी, काही दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरात होणाऱ्या चोरट्या महिलेची छेडछाड रोखून, प्रवाशांची मने जिंकली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसांनी कोरोनाची लागण झाली. त्यांनी लगेच रुग्णालय गाठले होते. 

परंतु, त्यांच्यावर कोविड Covid रुग्णालयात व्यवस्थित उपचार सुरू होते. मात्र त्यांना रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याची खंत व्यक्त करत होते,आणि सकाळी बारा वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

Edited By- Digambar Jadhav

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live