पोलिओ निर्मुलन की,  'दो बुंद' जीवघेणे?

saam tv
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

पोलिओ निर्मुलन की,  'दो बुंद' जीवघेणे?
आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणाची लक्तरं वेशीवर
आरोग्य विभागात चाललंय काय?

पोलिओ निर्मुलन की,  'दो बुंद' जीवघेणे?
आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणाची लक्तरं वेशीवर
आरोग्य विभागात चाललंय काय?

एकवेपोलिओ निर्मुलन की,  'दो बुंद' जीवघेणे?ळ उपचार झाले नाहीत तरी चालेल पण सरकारी हॉस्पिटल नको असं सामान्यांना वाटू लागलंय. राज्यातील सरकारी रुग्णालयांची अवस्था दारुण आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करुनही आरोग्य यंत्रणा आजारीच आहे. उपचारांसाठी गेलेल्या गोरगरीबांना उपचारांऐवजी अनास्थेचा सामना करावा लागतोय. आरोग्य विभागाच्या या ढिसाळपणाचा अनुभव कोरोनाच्या काळातही सामान्य जनतेला आला. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ग्रामीण भागातली आरोग्य यंत्रणा सुस्तावल्याचा आरोप झाला. कोरोनाच्या या संकटातून आपण बाहेर पडलो. पण सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा आजही कायम आहे, हे पोलिओ मोहिमेतून दिसून आलं. यवतमाळमध्ये 12 मुलांना पोलिओ ड्रॉपऐवजी चक्क सॅनिटायझर पाजण्यात आलं. हे कमी की काय पंढरपुरात बाळाला ड्रॉप देताना त्याच्या तोंडात चक्क ड्रॉपचं झाकणं गेलं. आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळपणाला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केलाय.

 

 राज्यातील जनतेचं आरोग्य ज्यांच्या हातात आहे ती आरोग्य यंत्रणात आजारी पडलीय की काय अशी स्थिती आहे. भंडाऱ्यातल्या जिल्हा रुग्णालयाच्या आगीची राख अजूनही थंड झालेली नाही तोपर्यंत यवतमाळमधील १२ मुलांना मृत्यूच्या दारात नेण्याचं पाप आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलंय. त्यामुळं नेहमीप्रमाणं चौकशी करणार, कारवाई होणार आणि विसरुन जाणार? की आरोग्य यंत्रणेला शिस्त लावणार हे पाहावं लागेल.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live