गोव्यात राजकीय हालचालींना वेग

गोव्यात राजकीय हालचालींना वेग

पणजी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप येथे कोणता पवित्रा घेणार याकडे घटक पक्षांचे तर घटक पक्ष काय करतील याकडे भाजपचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा वाढदिवस आज साजरा झाल्यानंतर यादिशेने निर्णायक पावले टाकण्यात येतील अशी चर्चा सुरु झाली आहे.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी अलीकडेच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारेन असे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री आपल्या अनुपस्थितीत केल्या जाणाऱ्या सार्वजनिक कामांसाठी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना पसंती देत असतात आताही १९ डिसेंबरच्या ध्वजारोहणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचीही सरकारचे नेतृत्व करण्याची इच्छा दडून राहिलेली नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा वाद नको म्हणून नाईक यांचे नाव पुढे आणण्यात येऊ शकते.

नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी अतिरीक्त खातेवाटप निदान लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करा असे सांगत मुख्यमंत्रीपदी पर्रीकरच कायम असावेत असे अप्रत्यक्षपणे सुचवले आहे. मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे नेतृत्व देण्यास त्यांनी हरकत नाही असे म्हटलेले नाही. मगोने ही मागणी केली असली तरी अलीकडे त्याचा पुनरूच्चार केलेला नाही. त्यामुळे या कोंडीतून भाजपलाच मार्ग काढावा लागणार अाहे. सरकार आणि भाजप याचे मुख्यमंत्री हेच एकमेव मार्गदर्शक असल्याने त्यांनाच यातून योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र तो निर्णय काय असेल यासाठी आणखीन एक दोन दिवसांचीच प्रतीक्षा करावी लागेल अशी माहिती मिळाली आहे.

सरकार स्थीर करण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदलाचा विषयही विचारात घेतला जाऊ शकतो. असे करताना कोणाला वगळून कोणाला संधी दिली जाऊ शकते याचीही चर्चा आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने या आठवड्यात राज्यपालांची भेट घेतली आहे. १४ रोजी राज्यपालांनी राज्यातच थांबावे अशी विनंती करण्यासाठी ती भेट होती असे सांगण्यात येते. त्यावरून मोठ्या राजकीय निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी सर्वकाही सध्या चर्चेच्या पातऴीवर आहे. जो काही निर्णय असेल तो मुख्यमंत्री घेणार असून त्याबाबत त्यांनी काहीच सुतोवाच केलेले नाही.

Web Title: Political actions speeds up in Goa

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com