सिंधुदुर्गमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटवर राजकीय वादंग

sindhudurg
sindhudurg

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात Sindhudurg कोरोना Corona रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आणि त्यांना उपचारार्थ लागणाऱ्या ऑक्सिजनची Oxygen कमतरता वेळोवेळी भासत असल्यामुळे काही जणांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. Political controversy over newly constructed oxygen plant in Sindhudurg

परंतु आता कुडाळ Kudal MIDC मध्ये अवघ्या पंधरा दिवसांमध्ये नव्याने लिक्विड ऑक्सीजन रिफील प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता या नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन Oxygen प्लांटवर Plant राजकीय टीका Critics होताना पाहायला मिळत आहे.

या प्लांटवर टीका करताना आमदार नितेश राणे Nitesh Rane म्हणाले की, नव्याने उभारण्यात आलेला ऑक्सीजन प्लांट पालकमंत्र्यांच्या भावाच्या पार्टनरशिप मधून उभारण्यात आला आहे. हा शासकीय प्लांट नाही आहे. त्याच्यात पण पैसे कमावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

एका बाजूला लोकांना ऑक्सिजनची गरज आहे तर एका बाजूला तुम्ही तुमचा व्यवसाय करताय ही आश्चर्याची गोष्ट आहे आणि त्याचे भागीदार जर मुख्यमंत्री होत असतील तर  यापेक्षा मोठी शोकांतिका नाही.

हे देखील पहा -

तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत Vinayak Raut म्हणाले की, ऑक्सीजन प्लांटची ऑर्डर दिल्यानंतर सहा महिन्याच्या अगोदर काम पूर्ण करण्याचं कोण बोलतच नाही. मग अशावेळी करायचं काय. ऑक्सिजनची गरज भासत असताना हे दोन उद्योजक समोर आले आणि सिंधुदुर्ग मध्ये आम्ही काही तरी करत आहोत नुसतं बोलत नाही हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com