नवी मुंबईच्या निवडणुकीचं राजकारण रंगतंय साताऱ्यात, वादामागे माथाडी मतांचं राजकारण?

साम टीव्ही
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

 

  • नवी मुंबईच्या निवडणुकीचं राजकारण रंगतय साताऱ्यात
  • नरेंद्र पाटील विरूद्ध शशिकांत शिंदे 
  • वादामागे माथाडी मतांचं राजकारण?

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि आ. शशिकांत शिंदे यांच्यातील वाद विकोपाला पेटलाय. साताऱ्यातल्या या वादाची धग नवी मुंबईपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. या आरोप-प्रत्यारोपामागचं नेमकं राजकारण काय आहे,

सध्या माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांच्यातून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. खासदारकीच्या निवडणुकीवरून नरेंद्र पाटील यांनी शिंदे यांच्यावर पुन्हा जोरदार टीका केलीय. त्यांनी सगळीकडे ढवळाढवळ करू नये असा टोलाही नरेंद्र पाटील यांनी लगावलाय. 

आ.शशिकांत शिंदे यांनीही नरेंद्र पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलंय. मी कायम पक्षाशी एकनिष्ठ राहिलोय. गद्दारी केली नाही अशा शब्दात त्यांनी नरेंद्र पाटील यांच्यावर प्रहार केलाय. 

या दोन्ही नेत्यांमधील वादाचं मुख्य कारण आहे माथाडी कामगारांच्या मतांचं गणित. कोरेगाव मधील पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी आपलं लक्ष आता नवी मुंबईच्या राजकारणाकडे वळवलंय. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आपल्या मुलाला उमेदवारी देऊन त्याच्या राजकारणाचा श्रीगणेशा करणार असल्याची चर्चा आहे. वाशीत माथाडी कामगारांचं वर्चस्व आहे. त्यामुळे दोन्ही वाद विकोपाला जाणं हे स्वाभाविक आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live