पूजाच्या आईवडिलांना 5 कोटी मिळाले? वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

साम टीव्ही
मंगळवार, 2 मार्च 2021

 

  • पूजाच्या आईवडिलांना 5 कोटी मिळाले?
  • शांताबाईंचा पूजाच्या आईवडिलांवर आरोप
  • राठोडांनी चव्हाणांना खरंच पैसे दिले का?

पूजा चव्हाणच्या मृत्यूमागील कारणांचा पोलिस शोध घेत आहेत. दुसरीकडं पूजाची कथित आजी शांताबाई राठोड आणि पूजाच्या वडिलांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत.

पूजा चव्हाण यांच्या मृत्यूनंतर तिच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी याच शांताबाई राठोड यांनी केली. पूजाच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी शांताबाई परळीतून पुण्यात आल्या. पोलिसांना भेटल्या, पोलिसांकडं एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. गप्प बसण्यासाठी पूजाच्या आईवडिलांनी 5 कोटी रुपये घेतल्याचा आरोप शांताबाईंनी केला.

शांताबाईंच्या आरोपांना पूजाच्या वडिलांनी उत्तर देणं टाळलंय. मात्र शांताबाई या नातेवाईक नसल्याचा दावा त्यांनी केलाय.

शांताबाई पूजाच्या नातेवाईक नसतील तर त्या पूजाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एवढ्या आग्रही का आहेत असा प्रश्नही इथं निर्माण झालाय.

साम टीव्ही


संबंधित बातम्या

Saam TV Live