शिवसेना नेत्यानं फासली अभियंत्याच्या तोंडाला शाई

दिनेश पिसाट
सोमवार, 7 जून 2021

म्हसळा तालुक्यातील विविध भागांतील रस्त्याच्या कामाला वेग आला आहे. मात्र या रस्त्यांचे काम निकृष्ट होत असून कामाचा दर्जा अत्यंत खालावलेला असल्याने पहिल्या पावसात या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या विरोधात म्हसळा येथे  शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेना माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी  रायगड जिल्हा परिषदेच्या म्हसळा शाखा अभियंत्यांच्या तोंडाला काळी शाही फासून निषेध करण्यात आला.

रायगड - जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील विविध भागांतील रस्त्याच्या कामाला वेग आला आहे. मात्र या रस्त्यांचे काम निकृष्ट होत असून कामाचा दर्जा अत्यंत खालावलेला असल्याने पहिल्या पावसात या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या विरोधात म्हसळा येथे  शिवसेनेच्या Shivsena वतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेना माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के Nandu shirke यांनी  रायगड Rigad जिल्हा परिषदेच्या म्हसळा शाखा अभियंत्यांच्या तोंडाला काळी शाही फासून निषेध केला. poor condition of roads during the first rain

हे  देखील पहा -

रस्त्या संदर्भात बैठकीला संबंधित अधिकारी बोलावले नसल्याचा आरोप शिवसेनेने केला. भापट येथील हा  रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. मोठ्या प्रतीक्षे नंतर हा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र शाखा अभियंता व ठेकेदार यांच्या चुकीच्या  कामाच्या पद्धतीने निकृष्ट व तकलादू रस्ता तयार झाला. पहिल्या पावसात या रस्त्याची दुर्दशा झाली. संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची मागणी आता जनतेतून जोर धरत आहे.

Edited By - Shivani Tichkule

 


संबंधित बातम्या

Saam TV Live