पुन्हा एकदा इमारत कोसळली 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

मुंबई: दक्षिण मुंबईमध्ये पुन्हा एकदा इमारत कोसळसीय...  क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या लोकमान्य टिळक रोडवरील एका ४ मजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

याबाबत हाती आलेल्या वृत्तानुसार, दक्षिण मुंबईत क्रॉफर्ड मार्केट परिसरात लोकमान्य टिळक रोडवरील ४ मजली अहमद या इमारतीचा काही भाग सकाळी १०. ४५ वाजण्याच्या सुमाराला कोसळला. या इमारतीत व्यावसायिक गाळे होते. ही इमारत जुनी आणि धोकादायक असल्याने काही दिवसांपूर्वी ही इमारत रिकामी करण्यात आली होती. यामुळे आजच्या घटनेत जीवितहानी टळली आहे.

Web Tittle : portion of bulding collapsed in mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live