एssशाब्बास! कस्तुरबातील 12 जणांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश

ब्युरो रिपोर्ट
मंगळवार, 24 मार्च 2020

जगात थैमान घालणारा कोरोना व्हायरस आता भारतातही हातपाय पसरू लागलाय. यावर उपाय म्हणून सरकारने संचारबंदी, लॉकडाऊन सारखे अनेक गंभीर पावलं उचलली आहेत.

मुंबई - कोरोनाच्या विळख्यात असलेल्या मुंबईकरांसाठी एक गुज न्यूज आहे. कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेले बारा कोरोनाग्रस्तांची आता कोरोनातुन मुक्तता झाल्याचं स्पष्ट झालंय. कस्तुरबा रुग्णालयात दाखल बारा जणांची दुसरी कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. खबरदारी म्हणून या सर्व कोरोनामुक्त बारा जणांना चौदा दिवस विलगीकरण अर्थात आयसोलेशन मध्ये राहावं लागणार आहे. या सर्वांना इतरांच्या संपर्कात येऊ नका हे सांगण्यात आलंय. त्यामुळे दिलासा जरी मिळाला असला तरीही काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे कोरोनाला घाबरणाऱ्यांनो काळजीचं कारण नाही. फक्त स्वत:ला सांभाळा, सूचनांचं पालन करा. मग कोरोना तुमच्या आसपासही भटकणार नाही.

 

जगात थैमान घालणारा कोरोना व्हायरस आता भारतातही हातपाय पसरू लागलाय. यावर उपाय म्हणून सरकारने संचारबंदी, लॉकडाऊन सारखे अनेक गंभीर पावलं उचलली आहेत. नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र या सर्व कारवाईतून  आरोग्य, पेट्रोलपंप, फार्मसी आदी  अत्यावश्यक सेवांना वगळून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केलाय. सर्व जगभर पसरलेल्या या महामारीपासून बचावासाठी स्वत:ला इतरांपासून वेगळं ठेवणं हाच उत्तम पर्याय सद्दस्थितीत आहे. मात्र या एकटेपणाचा सामना कसा करावा असा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच पडला असणार. त्यामुळे अशावेळी घरातील कामात किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्याला वेळ द्या. त्यांच्याशी विविध विषयावर गप्पा मारा.. घरच्याघरी युट्युबवर व्हिडीओ लावून काहीतरी नवीन करता येतंय का? ते पाहा... योग करा, व्यायामाकडे लक्ष द्या. फेसबुक, व्हॉट्सऍप सारख्या सोशल मीडिया माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहा. लिखाण करा, गाणी ऐका. धकाधकीच्या जीवनात वाचन राहिलं असल्यास, पुस्तकं वाचा. पुरेशी झोप घ्या. हे सगळे केल्याने तुम्ही मानसिकरीत्या खूप चांगले राहाल आणि कोरोनाशी दोन हात करण्यास तुम्हाला निश्चितच बळ मिळेल.

हेही वाचा  - स्वतःचा जीव धोक्यात घालून इटलीहून 263 भारतीयांना आणणारी सुपर वुमन

 

positive news 12 coronna patient treated normal in mumbai maharashtra


संबंधित बातम्या

Saam TV Live