चांगभलं! पुणे दाम्पत्य कोरोनामुक्त धुळवडीच्या दिवशी लागण, गुढीपाडव्याच्या दिवशी डिस्चार्ज

अमोल कविटकर
बुधवार, 25 मार्च 2020

हे दाम्पत्य 40 लोकांच्या ग्रुपसोबत दुबईला गेलं होतं...शिवाय, परतल्यानंतर त्यांनी मुंबई ते पुणे ओला केली होती..त्यामुळं या दाम्पत्याच्या संपर्काला आलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली होती. 

पुणे - महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त झाल्याची गुड न्यूज समोर आली आहे. या दाम्पत्याची दुसरी कोरोना चाचणी नेगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतलाय. याआधी चोवीस तासात केलेली त्यांची पहिली चाचणीसुद्धा नेगेटिव्ह आली होती. या दाम्पत्याला डॉ. नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, ते चौदा दिवस होम क्वारंटाईन राहणार आहेत.

 

डॉक्टरांनी केली कमाल

10 मार्च रोजी कोरोनाचे रुग्ण पुण्यात सगळ्यात आधी आढळून आले होते. त्यानंतर पुण्यातील रुग्णाचा आकडा वाढतच गेला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. यामुळे आता संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशातच आता पुण्यातील सगळ्यात आधी ज्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती, ते दाम्पत्य कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. 

 

टाळ्यांच्या गजरात निरोप

टाळ्यांच्या गजरात नायडू रुग्णालयातून बाहेर पडताना या दाम्पत्याला निरोप देण्यात आला. यावेळी कोरोनामुक्त झालेल्या या दाम्पत्याने डॉक्टरांचे महाराष्ट्रातील वैद्यकीय तज्ज्ञांचेही आभार मानले. तसंच साम टीव्हीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रियेत त्यांनी सर्व भारतीयांना सेल्फ होम क्वारंटाईन करण्याचं आवाहनही केलं. तब्बल 15 दिवसांच्या उपचारानंतर या दाम्पत्याला अखेर घरी सोडण्यात आलं आहे. 

 

550 जणांना घरी सोडलं

पुण्यात साडेपाचशे कोरोना संशयितांना डिस्चार्ज देण्यात आलाय. कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या आणि सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसलेल्या संशयित तसेच 'पॉझिटिव्ह' रुग्णांपैकी ५४८ जणांच्या घशातील द्रवाची चाचणी 'निगेटिव्ह' आली. त्यामुळे ५४८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आजमितीला ६०३ पैकी केवळ ५५ रुग्ण रुग्णालयात आहेत. 

 

धुळवडीला लागण, गुढीपाडव्याला डिस्चार्ज

राज्यात सर्वत्र धुळवड साजरी होत असतानाच पुण्यात मात्र कोरोनाचे रूग्ण आढळल्यानं खळबळ उडाली होती. पुण्यातील एक दाम्पत्य नुकताच दुबईहून परतलं होतं. भारतात परतल्यानंतर थोड्या दिवसातच त्यांना थंडी, ताप, आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला..त्यानंतर हे दाम्पत्य पुण्यातल्या नायडू रुग्णालयात दाखल झाले .त्यांचे कोरोना सॅम्पल्स पॉझिटीव्ह आढळले होते. 

हे दाम्पत्य 40 लोकांच्या ग्रुपसोबत दुबईला गेलं होतं...शिवाय, परतल्यानंतर त्यांनी मुंबई ते पुणे ओला केली होती..त्यामुळं या दाम्पत्याच्या संपर्काला आलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली होती. 

positive sstory pune couple gets discharge from hospital after cure marathi


संबंधित बातम्या

Saam TV Live