#coronavirusindia | कोरोनाच्या या बातम्या तुम्हाला लढण्याचं बळ देऊन जातील

ब्युरो रिपोर्ट
बुधवार, 25 मार्च 2020

आज गुढीपाडवा. गुढी उभारताना आज महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाविरुद्धच्या युद्धात लढतोय. काही जणांचा मृत्यू झाला आहे. पण ही लढाई जिंकूनच आपल्याला विजयी गुढी उभारायची आहे. 

मुंबई - सगळीकडे गोंधळ आहे. धास्ती आहे. दहशत आहे. अशातच गुढीपाढव्याच्या दिवशी काही दिलासादासक वृत्त समोर आलं आहे. अनेक नकारात्मक गोष्टींनी सगळीकडे नकारात्मक उर्जा पसरली आहे. मात्र आता आशेचा एक किरण दिसू लागला आहे. तशाच काही बातम्या समोर येत आहेत. आणि या बातम्या वाचून तुम्हाला लढण्याचं बळ मिळेल. 

 

वाचा कोरोनाशी संबंधित काही दिलासा देणा-या आणि बळ देणा-या बातम्या -  

- एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले

- लॉकडाऊनमुळे इटलीत मागच्या २ दिवसांत मृत्यू प्रमाण घटलं

- कोरोना पॉझिटिव्ह 95 वर्षीय महिला रुग्ण बरी झाली

- पुढच्या काही दिवसांत 1 लाख टेस्ट किट तयार होणार

- मागच्या 24 तासांत दिल्लीत एकही नवा रुग्ण नाही

- महाराष्ट्रातील 12 रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश

- राज्यातील पहिलं कोरोनाबाधित दाम्पत्य कोरोनामुक्त

- हातावर पोट असणाऱ्यांसाठी उद्योजकांकडून मदतीचा हात

 

राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनीदेखील याबाबतचं एक ट्वीट करत लोकांना सकारात्मक विचार करण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीत निराशेच्या या गर्तेत आपण प्रत्येकाने आता शांत आणि संयमी राहून सरकार, प्रशासन, आणि पोलिस यंत्रणेला सहकार्य करण्याची गरज आहे. 

 

आमदार रोहित पवार यांचं TWEET - 

 

 

 

 

गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले तेही ऐका 

 

positive story of corona virus in negative situations on covid 19 corona virus marathi maharashtra

 

 

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live