सांगलीवर पुन्हा महापुराचं संकट येण्याची शक्यता...

साम टीव्ही
शनिवार, 6 जून 2020
  • सांगलीकरांवर दुहेरी संकट 
  • 'कृष्णा'माईची पातळी वाढल्यास स्थलांतराच्या सूचना
  • आपत्तीसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

गेल्यावर्षी पावसानं सांगली जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. यातून लोक सावरत असतानाच कोरोना संकटानं हाहाकार माजवला. त्यात आता पुन्हा एकदा एका मोठ्या संकटाची चाहूल सांगलीकरांना लागलीय. 

ही दृश्य आहेत गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यात आलेल्या महाभयंकर पुराची. या पुरानं होत्याचं नव्हतं करून टाकलं. त्यातून लोक कसेबसे सावरलेही. तर नवं संकट आलं कोरोनाचं. कोरोनाचं हे संकट गडद होत असतानाच आता सांगलीकरांच्या चिंतेत आणखीन भर पडलीय. महापालिकेनं पूर पट्ट्यातील नागरिकांना पाण्याची पातळी 20 फुटांवर गेल्यावर स्थलांतरीत होण्याचे संकेत दिले आहेत. संभाव्य पूरस्थिती आणि मागील पुराचा अनुभव लक्षात घेता सांगली महापालिकेनं आपत्ती नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये पूर पट्ट्यात पाच ठिकाणी 24 तास बोट स्टेशन कार्यरत असणार आहे.. तर हायरिस्क परिसरातील 15 ठिकाणावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच राहणार आहे. 

पुराच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी मनपानं जय्यत तयारी केलीय. त्यानुसार,

आपत्तीसाठी मनपाची सज्ज यंत्रणा
एकूण फायर कर्मचारी - 62
अग्निशामक गाड्या - 7
रेस्क्यू व्हॅन - 1
लाईफ जॅकेट - 50
लाईफ रिंग -25 
वुड कटर-10
कॉम्बी टूल्स -2
यांत्रिक फायबर बोटी- 7 
ओबीएम मशीन - 7
आणि आपत्ती काळातील साहित्य उपलब्ध असेल. 

असे असेल नियोजन
तर 5 ठिकाणी 24 तास बोट स्टेशन
सांगली वाडी, कर्नाळ चौकी, टिळक चौक, होंडा शोरूम, कृष्णा घाट मिरज
प्रत्येक ठिकाणी 1 बोट आणि चार कर्मचारी कार्यरत असतील. 

पूराचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज असली तरी कोरोनाच्या महामारीमुळे यंदा पूरग्रस्त म्हणून कुणालाही एकत्र ठेवलं जाणार नाही. त्यामुळे पूर पट्ट्यातील नागरिकांना आपली व्यवस्था स्वतःच करावी लागेल. त्यामुळे यंदाचा पावसाळा सांगलीकरांची खडतर परीक्षा घेणारा असेल..
 


संबंधित बातम्या

Saam TV Live