चिंताजनक! राज्यात पुन्हा पुढचे 6 महिने बंधनं लादण्याची शक्यता - मुख्यमंत्र्यांचे संकेत

साम टीव्ही
रविवार, 27 सप्टेंबर 2020
  • कोरोना रोखण्यासाठी कठोर नियमांना तयार राहा
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
  • कोरोना रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्या
  • विविध जिल्ह्यातील कोरोनाचा स्थितीचा आढावा

कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासह जगाला ग्रासलंय. त्यामुळे आता सर्वांचीच चिंता वाढलीय. सगळीकडे आता अनलॉकची प्रक्रिया सुरु होत असतानाच, कोरोनाचा प्रभाव प्रचंड वाढत चाललाय. देशात हजारो मृत्यू झालेत. 

पाहा, यासंदर्भातील व्हिडिओ -

देशात कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये.  देशातील कोरोना रुग्णसंख्या 60 लाखाच्या घरात पोहोचलीय. गेल्या 24 तासांत देशात 88 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेत. तर मृतांचा आकडाही 94 हजारांच्या पार गेलाय.  देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे करोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली. तरी दिवसागणिक नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्याही मोठी आहे.

कोरोनाच्या विळख्यातून तब्बल पाच महिन्यांनंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असताना, राज्यात पुन्हा पुढील सहा महिने काही बंधनं लादली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असून. वेळप्रसंगी कठोर नियम करावे लागतील तर ते करा, असे आदेशच दिले आहेत. कोविडसंदर्भात औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर विभागनिहाय जिल्ह्यांच्या आढावा बैठका देखील मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतल्या आहेत.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live