स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ डाक पाकिटाचे आज अनावरण

विहंग ठाकूर
गुरुवार, 3 जून 2021

माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ डाक पाकिट अनावरण आज (3 जून) रोजी दुपारी एक वाजता करण्यात येणार आहे

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे Gopinath Munde यांच्या स्मरणार्थ डाक पाकिट Postal Envelope अनावरण आज (3 जून) रोजी दुपारी एक वाजता करण्यात येणार आहे.आज ३ जून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन आहे. Postal Department to release special envelope on Late Gopinath Munde

लोकनेते मुंडे यांनी चार दशके समाजकारण करत व राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी शेवटपर्यंत त्यांनी संघर्ष केला. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून व त्यांच्या स्मरणार्थ डाक पाकिट व तिकीट कॅन्सलेशन शिक्क्याचे अनावरण करण्यात येणार आहे. भाजपचे BJP राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा J P Nadda यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल पद्धतीने नवी दिल्ली आणि गोपीनाथ गड परळी येथून विमोचन सोहळा होईल.

हे देखिल पहा

या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे रावसाहेब पाटील दानवे, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, माजी मंत्री व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष  सुधीर मुनगंटीवार (ऑनलाइन लिंक मध्ये सहभागी होणार आहेत.Postal Department to release special envelope on Late Gopinath Munde

१२४ वर्षांच्या आजीने घेतली कोरोनाची लस

गोपीनाथ गडावरुन भाजपच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, खासदार भागवत कराड हे गोपीनाथ गडावरुन सहभागी होणार आहेत. आज दुपारी १ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live