'जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान' पुण्यात नवं पोस्टर

सागर आव्हाड
बुधवार, 4 मार्च 2020
  • होर्डिंगवर 'पाकिस्तान झिंदाबाद' म्हणणारी अमुल्या 
  • 'जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान'
  • पुण्यात झळकलं आक्षेपार्ह पोस्टर

पुणे -  पुण्यात आक्षेपार्ह मजकुरासह एक होर्डिंग सध्या सर्वांचाच चर्चेचा विषय ठरलाय. या होर्डिंगवर  'जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान', असा मजकूर छापण्यात आलाय. पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या चौकात हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. बंगळुरूमध्ये MIMखासदार असदुद्दीन ओवेसींच्या रॅलीत, अमूल्या नावाच्या मुलीने 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावेळचा फोटोही होर्डिंगवर छापण्यात आला आहे.  पोलिसांकडून सध्या या होर्डिंगचा तपास केला जातो आहे. हे पोस्टर नेमकं कुणी लावलं, याची कोणतीही माहिती मिळाली नसून पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 

पुण्यात याआधीही सातत्यानं अनेक हॉर्डिंग चर्चेचा विषय ठरले आहेत. अशातच आता हे नव होर्डिंग पुन्हा एकदा वादाचा विषय ठरण्याची शक्यताय. 

 

हे ही पाहा - 'दादा, मी प्रेग्नंट आहे'.. पुण्यातील हे बॅनर कुणी आणि कशासाठी लावलेत हे आलं समोर

 

कधी दिल्या होत्या आक्षेपार्ह घोषणा?

औवेसींच्या सभेत एका तरूणीनं पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. बंगळुरूत ओवैसींची सभा होती. त्यावेळी एक तरूणी भाषणासाठी मंचावर आली. पण तिथं येताच त्या तरूणीनं पाकिस्तानच्या बाजुनं घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर ओवैसी समर्थकांनी तिच्या हातातून माईक खेचून घेतला. त्यामुळे याठिकाणी काहीवेळ गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी या युवतीला तात्काळ ताब्यात घेतलं होतं. दरम्यान असदुद्दीन ओवैसींनीही या घोषणाबाजीचा तीव्र शब्दात निषेध केला होता. 

 

हे ही पाहा - SPECIAL | पुण्यात कायझर भाईचा वाढदिवस​

 

घोषणा देणारी अमूल्या कोण आहे?

दरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाऱ्या देणाऱ्या तरूणीचं नाव अमूल्या लियोना असं असून तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमुल्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आला आहोे. तर अमुल्याचा घराचीही अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली होती. सध्या तिच्या घरी पोलिसांचा मोठा फौज-फाटा तैनात करण्यात आल्याचं कळतंय. 

हे ही पाहा - INTRESTING | टिकटॉकवरील गावरान व्हायरल जोडप्याची कहाणी पाहिली का?

poster on anti pakistan in pune owesi police court


संबंधित बातम्या

Saam TV Live