प्रदेश काँग्रेसच्या सूचनेवरून उद्या एक दिवसाचे उपोषण

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 एप्रिल 2018

कऱ्हाड : प्रदेश काँग्रेसच्या सूचनेवरून उद्या सोमवारी (ता. ९) एक दिवसाचे उपोषण होणार आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी दिली.

सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून कराडमधील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. देश व राज्यात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न सत्तारूढ भाजपकडून होत आहे. त्यामुळा काँग्रेस पक्षाची जबाबदारी वाढली आहे.

देशासह राज्यात सामाजीक सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी प्रयत्न करण्याची कामगिरी काँग्रेसला करावी लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (ता. ९) एक दिवसाचे उपोषण करण्याच्या सूचना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अद्यक्ष खा. राहुल गांधी व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live