VIDEO | आंबेडकरांचे दोन्ही राजांवर ताशेरे, उदयनराजेंवर आक्षेपार्ह टीका तर संभाजी राजेंवरही घेतलं तोंडसुख

साम टीव्ही
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020
  • "एक राजा बिनडोक आहे"
  • आंबेडकरांची उदयनराजेंवर आक्षेपार्ह टीका
  • भाजपने राज्यसभेवर पाठवलंच कसं? - आंबेडकर
  • "संभाजीराजेंचं इतर गोष्टींवर अधिक भर"

मराठा आरक्षणावरुन बोलताना भारिप नेते प्रकाश आंबेडकरांनी, थेट नाव न घेता छत्रपती उदयनराजेंवर शेलक्या शब्दांत टीका केली. एक राजा बिनडोक असून, त्याला भाजपने राज्यसभेवर पाठवलंच कसं. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसंच मी कोणालाही शिंगावर घ्यायला घाबरत नाही, असाही थेट इशारा त्यांनी दिला. यासह संभाजीराजेंवरही त्यांनी तोंडसूख घेतलंय. संभाजीराजेंचं मराठा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींकडेच अधिक लक्ष असल्याची टीका त्यांनी केली.

पाहा आंबेडकर नेमकं काय म्हणाले...


संबंधित बातम्या

Saam TV Live