मराठा आंदोलनात काळे कपडे घालून प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटलांची एन्ट्री

Prakash Ambedkar participate Maratha Morcha in Kolhapur
Prakash Ambedkar participate Maratha Morcha in Kolhapur

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी Maratha reservation खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा मूकमोर्चा आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनीही भाग घेतला आहे. या आदोलनात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपचे BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी देखील आंदोलनात येऊन संभाजीराजेंना पाठिंब्यांचं निवेदन दिले आहे. prakash ambedkar participate maratha morcha in kolhapur 

यावेळी सर्वच आंदोलक काळ्या पोशाखात Black dress आले आहेत. स्वत: संभाजीराजेही Sambhaji Raje काळ्या पोशाखात आले आहेत. सर्व आंदोलकांनी काळे कपडे घालतानाच तोंडावर काळा मास्क Mask लावला आहे. सरकारचा Government निषेध करण्यासाठीच सर्वांनी काळा पोशाख घातला आहे. तसेच आंदोलकांच्या हातामध्ये भगवे झेंडे आहेत. यामुळे संपूर्ण वातावरण भगवामय झाले आहे.

8 वाजल्यापासून मराठा आंदोलक छत्रपती शाहू महाराज Chhatrapati Shahu Maharaj याच्या समाधीस्थळी जमा झाले आहे. यानंतर 10 वाजता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शाहू समाधीचे दर्शन घेऊन आंदोलनात भाग घेतला आहे. संभाजी छत्रपती यांनी देखील शाहू महाराजांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेतले आहे. संभाजी छत्रपती आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांची भेट घेऊन आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असल्याचं निवेदन दिले आहे. prakash ambedkar participate maratha morcha in kolhapur

कोणतीही कुणकुण नसताना, प्रकाश आंबेडकर या मोर्चात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संभाजीराजे आंबेडकरांना भेटले होते. त्यावेळी आंबेडकरांनीही मोर्चात येण्याचं ठरवले होते असे सांगितले जात आहे. संभाजीराजे यांनी नव्या राजकीय पक्षाचे संकेत दिले आहे.  यामुळे आंबेडकर आणि संभाजीराजे राज्यात नवे राजकीय समीकरण निर्माण तर करणार नाही, ना याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. 

हे देखील पहा 

मी मोर्चामध्ये नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात उतरलो आहे. मराठा समाजासाठी जो कोणी प्रयत्न करेल, त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा आहे. येणाऱ्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य करावे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com