उद्धव ठाकरे कणा नसलेले मुख्यमंत्री - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar - Uddhav Thackeray
Prakash Ambedkar - Uddhav Thackeray

पुणे : मुंबई पोलिसांपुढील अडचणी वाढत असताना त्याचा सरकारला फटका बसू नये, यासाठी ठाकरे सरकारमधील धुरिणांनी स्वतःची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे हे मागील पाच वर्षे सत्तेत होते. पण सचिन वाझे प्रकरण बाबतीत  उद्धव ठाकरे यांना माहिती नाही असे नाही. परंतु या प्रकरणाचा छडा लवकर लावायचा नाहीये. उद्धव ठाकरे यांना कणा नाही त्यामुळे हे सरकार बरखास्त करावं, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. Prakash Ambedkar Targeted CM Uddhav Thackeray over Sachin Waze Case

''सचिन वाझे प्रकरणात जे अधिकारी आहेत अधिकाऱ्याला कलेक्शन करायला सांगितले ही परिस्थिती आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यींच्या बदल्या केल्या गेल्या. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना हे कोणी सांगितलं? त्यांच्या पार्टीने सांगितलं का ? कॅबिनेट मध्ये हा विषय झाला होता का ? याची चौकशी व्हायला पाहिजे,'' असेही आंबेडकर म्हणाले. माझा फोन टॅप होत आहे, पण मी कुणाला घाबरत नाही, असाही आरोप आंबेडकर यांनी केला. 

कोरोना (Corona) स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, ''राजेश टोपे यांच्या लॉकडाउन बदलच्या प्रतिक्रियेला माझा विरोध आहे. कारण राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या म्हणण्यानुसार ८० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत.ते लोक आपल्या घरात राहू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना सुद्धा रुग्ण संख्या वाढत चालली आहे.  त्यात गोरगरिबांचे हाल होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नाही. लाॅकडाऊनला माझा विरोध आहे,'' कोरोनाच्या नावाखाली जे रॅकेट सुरु आहे, त्याची चौकशी व्हायला हवी, अशीही मागणी आंबेडकर यांनी केली. Prakash Ambedkar Targeted CM Uddhav Thackeray over Sachin Waze Case

ते म्हणाले, "या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. यात अडीच ते हजार प्रीमियमवरती शासनाच्या योजनेचा खर्च दाखवला जात आहे. या मध्ये गरिबांना लुटले जात आहे. जे लोक सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह आले तेच खाजगी मध्ये पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले आहे. यामुळे  
कोणत्या लॅबचा रिपोर्ट खरा हा प्रश्न पडला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने जम्बो सेंटर सुरु करण्यात आले आहे. जम्बो कोव्हीड सेंटर आता कॉन्ट्रॅक्टवर दिली आहेत. तिथं अजिबात चांगली परिस्थिती नाही. खासगी डॉक्टरांना तिथं रेफर केलं जातंय यामुळे सरकारने स्वतः जम्बो कोव्हीड सेंटर चालवावे,'' Prakash Ambedkar Targeted CM Uddhav Thackeray over Sachin Waze Case

पश्चिम बंगालच्या निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले, ''तिथे कार्यकर्त्यांकडूनच मोदींच्या (Narendra Modi) आदेशाचे उल्लंघन होत आहे. तेथे झालेल्या सभेनंतर पोलिसांनी मोदींवर केस केली नाही. माझे आवाहन आहे त्यांनी मोदींवर केस करून दाखवावी. बंगालच्या लोकांना डिवचले तर चालत नाही. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार तिथे जाऊन त्यांना डिवचत आहेत. ज्या ज्या वेळी ते तिथे जाऊन प्रचार करतील तितक्या ममता बॅनर्जींच्या जागा वाढत राहतील. 
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com