प्रशांत ठाकुर यांना पनवेलमधून विजयी आघाडी

प्रशांत ठाकुर यांना पनवेलमधून विजयी आघाडी


प्रशांत ठाकुर हे पुन्हा एकदा पंनवेलमधून निवडून येतायत. प्रशांत ठाकुर यांना पनवेलमधून विजयी आघाडी मिळाली आहे. 24 व्या फेरी नंतर प्रशांत ठाकूर 177081 मतं, शेकापच्या हरेश केणी यांना 85564 मतं तर NOTA ला तब्बल 12285 मतं पडली आहेत. दमयान, प्रशांत ठाकुर यांनी पनवेमधून विजयाची हॅट्रिक केलीये   

रायगडमधील सर्वाधिक कमी मतदान पनवेलमध्ये झालंय. अशातच आता पनवेलमध्ये शेकाप बाजी मारणार की पुन्हा एकदा भाजपच जिंकणार या चर्चना उधाण आलं होतं.  पनवेलमध्ये ५४.१३ टक्के मतदान झालंय. हे मतदान प्रशांत ठाकुर यांच्या पथ्यावर पडलंय. 


पनवेल प्रशांत ठाकूर यांना उत्तर भारतीयांच्या मताचा फायदा ?  

आमदार प्रशांत ठाकूर यांना पनवेल मधील सर्वच समाजाचा पाठिंबा मिळताना पाहायला मिळाला. या मतदार संघात असलेल्या सर्व भाषिक समाजाचे कार्यकर्ते मतदार संघात आमदार ठाकूर यांच्या प्रचारात उतरल्याने आमदार ठाकूर यांना त्याचा फायदा मिळाल्याचं बोललं जातंय. आमदार ठाकूर आणि प्रामुख्याने भाजपाने प्रामुख्याने शहरी भागात राहायला आलेल्या या नवमतदारांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यावर भर दिल्याने शहरी भागातील विविध भाषिक मतदार आमदार ठाकूर यांच्या कार्याने प्रभावित झाल्याचे भारतीय जनता पार्टीत मागील काही दिवसात झालेल्या पक्षप्रवेशावरून पाहायला मिळालं आहे. प्रशांत ठाकुर यांच्या कार्यकर्त्यांनी विजयानंतर असा जल्लोष साजरा केला 


WebTitle : prashant thakur won from panvel vidhansabha constetuency
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com