महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त २ दिवसांपासून बेपत्ता ! 

चेतन इंगळे
शुक्रवार, 4 जून 2021

वसई विरार महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव २ जून पासून  बेपत्ता आहेत. ते अचानक बेपत्ता झाल्यामुळे महापालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

वसई विरार : वसई विरार महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव २ जून पासून  बेपत्ता आहेत. ते अचानक बेपत्ता झाल्यामुळे महापालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना रुग्णांची विल्हेवाट लावण्याच्या प्रभारी पदभार प्रेमसिंग जाधव यांच्या कडे होता. मागील एक वर्षापासून ते हे काम करत होते. Premsingh Jadhav has been missing since June 2

कामावरून घरी परत न आल्याने प्रेमसिंग जाधव यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारी वरून, प्रेमसिंग सिंग जाधव ते २ जून पासून घरी परतलेच नाहीत. त्यामुळे जाधव यांच्या परिवाराने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

'Dream Girl' या चित्रपटातील रिंकू सिंग निकुभचे कोरोनामूळे निधन 

यावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग जाधव यांचे शेवटचे लोकेशन विरार रेल्वे स्थानक दाखवत असून, यावर विरार पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रेमसिंग जाधव यांचा परिचय -

प्रेमसिंग जाधव यांनी आपल्या कार्यकाळात अनेक बेकायदेशीर बांधकाम भुईसपाट केली आहेत. अनेक बेकायदेशीर इमारत व उद्धद्योजिग गाळ्यांचे विल्हेवाट लावण्याचे काम प्रेमसिंग जाधव यांनी केले होते. मात्र साहाय्यक आयुक्त अचानक बेपत्ता झाल्या मुळे, वसई विरार महापालिकेत एकच खळबळ आणि चर्चा उडाली आहे. 

प्रेमसिंग जाधव यांना बेपत्ता केले गेले आहे की ? ते स्वतः कुठे गेले आहेत? या प्रश्नांवर अजून तरी प्रश्नचिन्ह आहे. मात्र विरार पोलीस याचा अधिक तपास घेत आहेत. 

Edited By-Sanika Gade
 


संबंधित बातम्या

Saam TV Live