VEDIO | नेपाळमध्येही राममंदिर उभारण्याची तयारी

साम टीव्ही
रविवार, 9 ऑगस्ट 2020
  •  
  • नेपाळमध्येही राममंदिर उभारण्याची तयारी
  • अयोध्येच्या धर्तीवर उभं राहणार मंदिर
  • पंतप्रधान ओलींचे आदेश

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा पार पडलेला असतानाच आता नेपाळमध्येही राममंदिर बांधण्याची तयारी सुरू झालीय. नेपाळचं हे राममंदिर नेमकं कुठे असेल.

अयोध्येच्या धर्तीवर नेपाळमध्येही भव्य राममंदिर साकारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. नेपाळमधल्या ठोरी परिसराजवळ अयोध्या अस्तित्वात होती, असा दावा करत नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी संबंधितांना तसे आदेश दिलेत. या मंदिर उभारणीचा खर्च नेपाळ सरकार करणार असल्याचं समजतंय. 

रामाचं जन्मस्थान नेपाळमध्ये असल्याचा दावा करत ओलींनी यापुर्वीही खळबळ उडवून दिली होती. मात्र ओलींचा हा दावा भारताने जोरकसपणे खोडून काढला होता. शिवाय नेपाळमध्येही ओलींच्या भूमिकेला विरोध झाला होता. तरीही आता ठोरीजवळ भव्य राम मंदिराच्या उभारणीची तयारी ओलींनी चालवलीय. ठोरी आणि माडी या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींची काठमांडूत एक बैठक घेऊन ओलींनी मंदिर उभारण्याची तयारी करण्याचे आदेश दिलेत. शिवाय माडी नगरपालिकेचं नाव बदलून अयोध्यापुरी ठेवण्याचेही निर्देश देण्यात आलेत. येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर या मंदिराच्या उभारणीला सुरूवात करण्याचा मनोदय नेपाळ सरकारने व्यक्त केलाय. एकूणच गेली तीन दशकं भारताच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेला राममंदिराचा मुद्दा आता नेपाळच्या राजकारणाच्या केंद्रस्थानीही येऊ पाहतोय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live