पंढरपूर विधानसभा पोट निवडणुक प्रशासकीय तयारी पूर्ण..

भारत नागणे
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूकी साठी उद्या मतदान होणार असून प्रशासनाकडून आज ई व्हीएम मशीन आणि आवश्यक साहित्य सर्व मतदान केंद्रावर रवाना करण्यात येत आहे

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा Pandharpur Mangalwedha विधानसभा पोट निवडणूकी साठी उद्या मतदान होणार असून प्रशासनाकडून आज ई व्हीएम मशीन आणि आवश्यक साहित्य सर्व मतदान केंद्रावर रवाना करण्यात येत आहे. Preparations for Pandharpur Bi Election is over

पंढरपूर विधानसभा Legislative Assembly पोट निवडणूक साठी २१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सर्व तयारी निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी पूर्ण करून घेतली आहे.

उद्या सकाळी ७ पासून संध्याकाळी ७ पर्यंत मतदान Voting करता येणार आहे.३ लाख ४० हजार ५२४ मतदार आहेत. ३२८ मूळ मतदान केंद्र असून १९६ सहायक मतदान केंद्र असतील. या मतदान केंद्रासाठी ५२४ कंट्रोल युनिट, १०४८ बॅलेट युनिट, ५२४ विवी पॅट मशीन, २१० कंट्रोल युनिट, ४२०बॅलेट युनिट राखीव असतील. निवडणूक साठी २५५२ अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती असणार आहे. ९४ एस्टी बस आणि ३ जीप मधून हे साहित्य त्यात्या मतदान केंद्रावर पाठवले जाईल.

Edited By - Amit Golwalkar

 


संबंधित बातम्या

Saam TV Live