जालन्यात तिसऱ्या लाटेची तयारी सुरु ; राजेश टोपे यांची माहिती 

वृत्तसंस्था
रविवार, 6 जून 2021

तिसरी लाट येऊ नये अशी प्रार्थना देवाकडे करतो. तिसऱ्या लाटेचा फटका बसू नये म्हणून प्रत्त्येक जिल्ह्यात पिडियाट्रिकचे वार्ड तयार करणं.  पिडियाट्रिकचे टास्क फोर्स तयार करणं ही प्रक्रिया सध्या राज्यात पूर्ण करण्याचे काम सुरु असल्याची माहिती टोपे यांनी दिली

वृत्तसंस्था : आपण सोशल डिस्टंसिंग ठेवून व्यवस्थित काळजी घेतली तर तिसरी लाट येणार नाही अशी शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. तिसरी लाट येऊ नये अशी प्रार्थना देवाकडे करतो. तिसऱ्या लाटेचा फटका बसू नये म्हणून प्रत्त्येक जिल्ह्यात पिडियाट्रिकचे वार्ड तयार करणं.  पिडियाट्रिकचे टास्क फोर्स तयार करणं ही प्रक्रिया सध्या राज्यात पूर्ण करण्याचे काम सुरु असल्याची माहिती टोपे यांनी दिली. (Preparations for the third wave begin in Jalna; Information of Rajesh Tope) 

आज आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज जालना जिल्हा परिषद कार्यालयात शिवस्वराज्य दिनानिमित्त भगवा ध्वज फडकवण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. म्युकरमायकोसिसच्या रूग्णांना मोफत उपचार करून घ्यायचे असतील तर या रुग्णांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबरोबरच शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे असं आवाहन त्यांनी केलं.यासाठी राज्यातील महात्मा ज्योतीबा फुले योजनेतील  131 रुग्णालयांची निवड करण्यात आल्याचे ते म्हणाले.

शिवकालीन 'होना'च्या साक्षीनं शिवराज्याभिषेक सोहळा होतोय साजरा

म्युकरमायकोसी रुग्णांकडून खाजगी रुग्णालयानी जास्त पैसे उकळू नये म्हणून क्लास ABC अशा पध्दतीने शहरांची वर्गवारी ठरवली असून त्यानुसार बिल आकारण्यात येईल मात्र ते बिल 2 ते 5 लाखांच्या आतच असेल असं ते म्हणाले. राज्यात लावलेल्या लॉकडाऊनमुळे चांगले परीणाम झालेले दिसून आले असून राज्यातील 7 लाख असलेली कोरोनाबाधिततांची संख्या 2 लाखांवर आल्याचं टोपे यांनी सांगितलं.

लसींची उपलब्धता नसल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना राज्यात लसीकरण बंद आहे.राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना जलदगतीने लसीकरण करण्यासाठी परदेशातून लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून कोविशील्ड आणी कोव्हॅकसीनचा राज्याला अखंडित पुरवठा कसा होईल यासाठी देखील प्रयत्न सुरु असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी झाली असून लहान मुलांना धोका पोहचू नये यासाठी केंद्राने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार आवश्यक तयारी झाली असल्याची माहिती देखील टोपेंनी दिली.

सोमवार पासून लेव्हल एक ते चार पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून लेव्हल एक मधील जिल्ह्यांना दुकानं उघडण्यासाठी कोणतेही निर्बध असणार नाही.लेव्हल दोन मध्ये जास्त निर्बध नसले तरी चार वाजेपर्यंत दुकानं उघडे ठेवता येईल मॉलना निर्बध असतील.लेव्हल चार मध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहील अशी माहिती देखील त्यांनी दिली.उपलब्ध असलेले ऑक्सिजन बेडस,कोरोनाबधितांची संख्या यावरून ही स्थिती ठरवल्या जात असून घालून दिलेले नियम पाळले तर आपण कोरोनापासून दूर राहू असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. 

Edited By- Anuradha Dhawade 


संबंधित बातम्या

Saam TV Live